Lok Sabha Election Saam Digital
लोकसभा २०२४

Lok Sabha Election : काँग्रेसचा मोदींवर पलटवार; पाकिस्तान, बिर्याणीचा संबंध जोडत गंभीर आरोप

Lok Sabha Election 2024 : नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेस ही पाकिस्तानची बी टीम असल्याच्या वक्तव्यावर नाना पाटोले यांनी मोदींवर पलटवार केला आहे.

Sandeep Gawade

भूषण अहिरे

नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेस ही पाकिस्तानची बी टीम असल्याच्या वक्तव्यावर नाना पाटोले यांनी मोदींवर पलटवार केला आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात पाकिस्तानची आठवण काढणं म्हणजे नरेंद्र मोदींच्या पायाखालची जमीन सरकली आहे. नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानमध्ये जाऊन खाललेल्या बिर्याणीची आठवण येत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानावर भाष्य केलं. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात महाविकास आघाडीच्या शंभर टक्के जागा पुढे असून, तिसऱ्या टप्प्यात आजच्या दिवशी देखील महाविकास आघाडी पुढे आहे. चौथ्या टप्प्यात देखील महाविकास आघाडी पुढे असल्याचं चित्र असल्याचा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

पवार कुटुंबीयांच्या वादात काँग्रेसला पडायचं नाही, आणि त्यांच्याशी आम्हाला कुठलंही घेणं देणं नाही, असं म्हणत, नाना पटोले यांनी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या घरी जाऊन घेतलेल्या भेटीवर बोलताना मत व्यक्त केल आहे. गेल्या साठ वर्षांमध्ये काँग्रेसने केलेल्या विकासानंतर भाजपने दहा वर्षात फक्त विकण्याचं काम केलं, असा आरोप नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT