Amit Shah On Rahul Gandhi  Saam Tv
लोकसभा २०२४

Amit Shah News: देशात समान नागरी कायदा लागू करणारच; अमित शहा कडाडले, काँग्रेसला दिला इशारा

Lok Sabha Election 2024: काहीही झालं, तरी देशात समान नागरी कायदा लागू करणारच, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते गुना येथील जाहीर सभेत बोलत होते.

Satish Daud

Amit Shah on Article 370

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची गॅरंटी दिली आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात धार्मिक वैयक्तिक कायदा कायम ठेवण्याचे आश्वासन दिलं जात आहे. मात्र, काहीही झालं, तरी देशात समान नागरी कायदा लागू करणारच, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते गुना येथील जाहीर सभेत बोलत होते.

मध्यप्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघात ज्योतिरादित्य शिंदे सिंधिया यांच्या समर्थनार्थ अमित शहा यांनी शुक्रवारी (ता. २६) जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी राहुल गांधींसह (Rahul Gandhi) इंडिया आघाडीला चांगलेच खडेबोल सुनावले.

"काँग्रेसच्या मतानुसार, देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे. मात्र भाजपासाठी गरीब, दलित, इतर मागासवर्गीय आणि आदिवासींचा पहिला अधिकार आहे", असं अमित शहा (Amit Shah) म्हणाले.

"काँग्रेसचा जाहीरनामा काळजीपूर्वक वाचा. त्यात त्यांनी म्हटलंय की, ते शरीयत कायदा पुन्हा आणणार आहेत. त्यांना तिहेरी तलाक परत आणायचा आहे. हा देश इस्लामी कायद्याने चालवता येईल का?" असा संतप्त सवाल देखील अमित शहा यांनी उपस्थितांना केला.

"काँग्रेसचा जाहीरनामा काळजीपूर्वक वाचा. त्यात त्यांनी म्हटलंय की, ते शरीयत कायदा पुन्हा आणणार आहेत. त्यांना तिहेरी तलाक परत आणायचा आहे. हा देश इस्लामी कायद्याने चालवता येईल का?" असा संतप्त सवाल देखील अमित शहा यांनी उपस्थितांना केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं! मालेगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे 'हे' हिल स्टेशन

Maharashtra Live Update: मनोज जरांगे पाटील यांना अचानक आली चक्कर

मतदान केलं त्यांनी निधी मागायचा नाही; मंत्री पंकजा मुंडेंची कुणाला तंबी?

Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव

लास्ट स्टेजमधील कॅन्सर बरा होऊ शकतो का?

SCROLL FOR NEXT