Mumbai High Court  Yandex
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024: तळीरामांसाठी महत्वाची बातमी! मतमोजणीच्या निकालापर्यंत मद्यविक्री बंदीचा आदेश

Mumbai High Court Ban Liquor Sale: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत पाचव्या टप्प्यात २० मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर १८ ते २० मे आणि ४ जुन रोजी मतमोजणीचा निकाल जाहीर होईपर्यंत मद्यविक्रिला बंदी घालण्यात आली आहे.

Rohini Gudaghe

राज्यात तळीरामांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत पाचव्या टप्प्यात २० मे रोजी लोकसभेसाठी मतदान (Lok Sabha Election 2024) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर १८ ते २० मे दरम्यान मद्यविक्रीला मनाई कऱण्यात आली आहे. या काळात मद्यविक्रीस बंदी घालण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. सुरूवातीला निकालाच्या दिवशी मद्यविक्रीस बंदी घालण्यात आल्याचं ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात सांगितलं होतं.

मात्र, याविरोधकात याचिकाकर्त्यांनी सुधारित आदेश देण्याची मागणी केली होती. याप्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मतदानाच्या दोन दिवस आधी मद्यविक्री बंदी घालण्यास आक्षेप नाही. परंतु, निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी (Lok Sabha Election Result) मद्यविक्रीला बंदी जाचक असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकील आर. डी. सोनी यांनी न्यायालयात सांगितलं होतं.

निकालाच्या दिवशी सायंकाळनंतर मद्यविक्रीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यांनी ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढलेल्या मद्यविक्री बंदीच्या (Ban Liquor Sale) आदेशामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली होती. यापूर्वी न्यायालयाने दिलेला अशा आदेशांचा दाखला देखील यावेळी त्यांनी दिला होता. यावेळी अतिरिक्त सरकारी वकील अश्विनी पुरव यांनी न्यायालयात याचिकाकर्त्यांच्या या मागणीला विरोध केला होता.

परंतु, याचिकाकर्त्यांचे बाजु लक्षात घेऊन खंडपीठाने (Mumbai High Court) जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढलेल्या मद्यविक्री बंदीच्या आदेशात सुधारणा केली आहे. त्यांनी निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईपर्यंत मद्यविक्री बंदीचा आदेश लागू राहील, असं सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत १८ ते २० मे आणि ४ जुनपर्यंत मतदानाचा निकाल जाहीर होईपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: मॉइश्चराज आणि ग्लोईंग स्किनसाठी वापरा हा घरी बनवलेला फेसमास्क, ५ दिवसात दिसेल फरक

शक्तीपीठ महामार्गावरून शिंदेंच्या शिवसेनेत मतभेद, २ आमदारांमध्येच जुंपली

Hotel amenities: हॉटेलच्या रूममधील या गोष्टी तुम्ही मोफत घरी घेऊन जाऊ शकता

Deool Band 2: शेतकरी महिला घेणार स्वामींची परीक्षा...; 'देऊळ बंद २' चा डोळ्यात पाणी आणणारा टीझर प्रदर्शित

Avoid Rice Benefits: रात्री भात खाणं बंद केल्यास शरीरात काय बदल होतात?

SCROLL FOR NEXT