Sanjay Raut On Prakash Ambedkar Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024: 'प्रकाश आंबेडकरांना वेगळा प्रस्ताव जाणार नाही', मविआ लोकसभा निवडणूक जागावाटपाबद्दल राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut On Prakash Ambedkar: 'प्रकाश आंबेडकरांना वेगळा प्रस्ताव जाणार नाही. आता जो प्रस्ताव आहे त्यावरच प्रकाश आंबेडकर चर्चा करतील', असं ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut On Prakash Ambedkar:

'प्रकाश आंबेडकरांना वेगळा प्रस्ताव जाणार नाही. आता जो प्रस्ताव आहे त्यावरच प्रकाश आंबेडकर चर्चा करतील', असं ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. देशात लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. असं असलं तरी अद्याप महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यातच महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला चार जागेचा प्रस्ताव दिला आहे. यावरच माध्यमांशी बोलताना राऊत असं म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर संजय राऊत म्हणाले आहेत की, ''निवडणूक जाहीर झाल्याचं आम्ही संगत करतो. आम्ही परिवर्तनचा चंग मांडला आहे. आम्ही आमचा निर्धार पूर्ण करू. निवडणूक आयोग दबादवाखाली काम करतोय, असा संशय निर्माण लोक करतात. हे निरसण आयोगाने करावे. लोक साशांक आहेत.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले, ''मोदी आणि निवडणूक आयोग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मोदी याची गॅरंटी घेणार का निवडणूक पारदर्शक पणे होईल.'' राऊत म्हणाले, ''महाविकास आघाडीमध्ये सगळं ऑल इज वेल आहे. मित्र पक्षांसोबत बोलणी सुरु आहे. वंचितला ४ जागेचा प्रस्ताव दिला आहे.''  (Latest Marathi News)

दरम्यान, याच मुद्द्यावर बोलताना वचिंत बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले होते की, ''महाविकास आघाडीने अकोला व्यतिरिक्त ज्या दोन जागांचा प्रस्ताव दिला आहे, तो वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने एकमताने फेटाळला आहे. अकोल्याची जागा सोडण्याची तयारी आम्ही दाखवली होती, तरी आम्हाला हरणाऱ्या दोन जागा ज्या दिलेल्या आहेत. त्या आम्हाला नको.''

मोकळे म्हणाले होते की, ''मविआच्या बैठका होत आहेत. त्या बैठकांना आम्हाला बोलावत नव्हते, २ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या दरम्यान झालेल्या कोणत्याही बैठकीत आम्हाला बोलावलं नाही. शेवटची बैठक ही ६ मार्च रोजी झाली, आज १५ मार्च आहे. अद्याप कोणताही संवाद महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाकडून आमच्याशी झालेला नाही. या पद्धतीची वागणूक वंचित बहुजन आघाडीला दिली जात आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

SCROLL FOR NEXT