Maharashtra Loksabha Election Exit poll results LIVE 
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 Exit Poll LIVE: महायुतीच्या अपेक्षांना सुरूंग लावणारा एक्झिट पोल अंदाज? जाणून घ्या कोणाला किती मिळणार जागा?

Maharashtra Loksabha Election Exit poll results LIVE : आज लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज वर्तवला जात आहे. अनेक वृत्तवाहिन्यांनी आपले एक्झिट पोल जाहीर केलेत. महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये धक्कादायक निकाल लागणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Bharat Jadhav

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडल्यानंतर आज संध्याकाळपासून एक्झिट पोल अंदाज जारी केले जात आहेत. अनेक वृत्तवाहिन्यांसह सामवरही लोकसभा निवडणुकीचे अंदाज वर्तवण्यात आलेत. वर्तवण्यात आलेल्या अंदाजात महायुतीला आणि महाविकास आघाडीला मिळणाऱ्या जागांमध्ये फक्त एक ते दोन जागांचा फरक दिसत आहे.

हाती आलेल्या पोलच्या अंदाजानुसार, राज्यात महायुतीला २५ जागा मिळणार आहेत तर महाविकास आघाडीला २१ ते २३ जागा मिळण्याची शक्यता आहे.एक्झिट पोलच्या अंदाजानुसार शरद पवार गटाला सात जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्ष फुटीनंतरही शरद पवार गटाला जास्त जागा मिळताना दिसत आहे. महायुतीमध्ये अजित पवार गटाला फक्त १ जागा मिळताना दिसत आहे. शिंदे गटाला ५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला १७ मिळण्याची शक्यता आहे.

कोणत्या पक्षांनी किती जागा लढल्या?

राज्यात यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यामुळे ही निवडणूक कशी होणार याकडे जनता कोणाला साथ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होतं. या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. दरम्यान आज जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला पसंती मिळताना दिसत आहे.

एबीपी माझा-सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात दिसली रस्सीखेच दिसत आहे. महायुती व मविआला निम्म्या निम्म्या जागांचा अंदाज आहे. महायुतीला २४ तर मविआला २३ जागांचा अंदाज. भाजप १७ , तर शिंदे गटाला ६ जागांचा अंदाज आहे. अजित पवार गटाला फक्त एक जागेवर विजय शक्य असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मविआमध्ये काँग्रेसला ८, ठाकरे गटाला ९ जागा तर शरद पवार गटाला ६ जागा मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

SCROLL FOR NEXT