Richest Candidates in Lok Sabha 2024 Saam TV
लोकसभा २०२४

Richest Candidates: लोकसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार, तब्बल ५,७०५ कोटींची संपत्ती; कोण आहेत डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी?

Richest Candidates in Lok Sabha 2024 : गुंटूर लोकसभा मतदारसंघातील तेलुगू देसम पक्षाचे उमेदवार डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी हे देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे एकूण ५,७०५ कोटींची संपत्ती आहे.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना निवडणूक आयोगाकडून उमेदवाराच्या संपत्तीविषयीची माहिती घेतली जाते. उमेदवाराकडे किती रुपयांची प्रॉपर्टी आहे. त्यांचे एकूण उत्पन्न किती आहे. त्यांच्यावर किती रुपयांचं कर्ज आहे, याबाबतची माहिती द्यावी लागते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही निवडणूक आयोगाने उमेदवारांकडून संपत्तीची माहिती घेतली.

या अर्जातून उमेदवारांची एकूण संपत्ती समोर आली आहे. तेलंगणातील गुंटूर लोकसभा मतदारसंघातील तेलुगू देसम पक्षाचे उमेदवार डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी हे देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे एकूण ५,७०५ कोटींची संपत्ती आहे. यामध्ये अलिशान गाड्यांचाही समावेश आहे.

कोण आहेत चंद्रशेखर पेम्मासानी?

चंद्रशेखर पेम्मासानी हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. १९९९ मध्ये त्यांनी भारतात एमबीबीएसची पदवी घेतली आहे. त्यानंतर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण त्यांनी अमेरिकेतून घेतलंय. येथील गेजिंजर मेडिकल सेंटरमधून चंद्रशेखऱ यांनी MD पदवी प्राप्त केली आहे.

डॉ. चंद्रशेखर यांच्याकडे एकूण ५,७०५ कोटींची संपत्ती आहे. यामध्ये भारत आणि विदेशातील मालमत्तेचाही समावेश आहे. त्यांच्याकडे १०१ कंपन्यांचे शेअर्स देखील आहेत. याशिवाय जंगम मालमत्तेमध्ये त्यांच्याकडे दोन मर्सिडीज कार, एक टेस्ला आणि एक रोल्स रॉयस कार आहे. त्यांच्यावर १,१३८ कोटी व्यावसायिक कर्जही आहे.

विशेष बाब म्हणजे, २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत गुंटूरमध्येच टीडीपीचे उमेदवार गल्ला जयदेव देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार होते. ते अमरा राजा ग्रुपचे एमडी आहेत. त्यांच्याकडे एकूण ६८० रुपयांची संपत्ती होती. यंदा निवडणुकीपूर्वीच त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. त्यांच्या जागी डॉ. चंद्रशेखर यांना टीडीपीकडून उमेदवारी मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT