Dr. Jyoti Mete Saam TV
लोकसभा २०२४

Dr. Jyoti Mete : मोठी बातमी! शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

Lok Sabha Election : शरद पवार आणि आमच्यात कुठं काय खटकलं? हे मला सांगता येणार नाही, असं डॉ. ज्योती मेटे यांनी म्हटलंय. शिवसंग्राम प्रदेश कार्यकारणीसोबत चर्चा करून लोकसभा निवडणुकीविषयी कोणासोबत जायचं? याचा निर्णय घेणार असं त्यांनी सांगितलं.

Ruchika Jadhav

शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी बीड लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मी लोकसभा निवडणूक लढणार अशी भूमिका त्यांनी मुंबईतून जाहीर केली होती. बीड लोकसभा मतदाससंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्या इच्छुक होत्या. मात्र आता त्यांनी माघार घेतल्याचे स्वत: म्हटले आहे.

आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन मी निवडणूक लढणार नाही, अशी भूमिका डॉ. ज्योती मेटे यांनी जाहीर केली आहे. ३ एप्रिल रोजी डॉ. ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. या सर्वांवर पत्रकार परिषदेत डॉ. ज्योती मेटे यांनी भाष्य केलं आहे.

शरद पवार आणि आमच्यात कुठं काय खटकलं? हे मला सांगता येणार नाही, असं डॉ. ज्योती मेटे यांनी म्हटलंय. शिवसंग्राम प्रदेश कार्यकारणीसोबत चर्चा करून लोकसभा निवडणुकीविषयी कोणासोबत जायचं? याचा निर्णय घेणार. व्यापक समाजहित लक्षात घेऊन, मतांचे विभाजन होऊ नये म्हणून निर्णय घेतल्याचे डॉक्टर ज्योती विनायकराव मेटे यांनी स्पष्ट केलं आहे.

मी बीड लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी जनभावना होती. त्यामुळे मी त्या दृष्टीने विचार केलाय, परंतु व्यापक समाजहित लक्षात घेऊन मी बीड लोकसभेच्या मैदानातून माघार घेत असल्याचे ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक लढवावी असा जनतेचाच आग्रह होता. त्यामुळे मी त्या दृष्टीने चाचपणी केली तसेच उमेदवारी देखील मागितली होती. परंतु आता मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

ज्योती मेटे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मोर्चा अन जरांगे पाटील यांचे बीडमधील सहकारी देखील उपस्थित होते. समाज म्हणून आम्ही ज्योती मेटे यांच्यासोबत आहोत, असं मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओव्हरटेकवरून वाद... नंतर रागाने पाहिलं, नागपूरात अभियांत्रिकी विद्यार्थ्याची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या

Albattya Galbattya Natak: कल्याणच्या नाट्यगृहाची अवस्था पाहून कलाकार संतापले; 'अलबत्या गलबत्या' कलाकारांचा व्हिडिओ व्हायरल

Thane Politics : ठाण्याच्या राजकारणात खळबळ! शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, कारण काय?

Kalyan Crime: पूजा पाठ करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कल्याणमधील संतापजनक घटना

NEET UG Exam: नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, देशभरातून १६ संशयितांना ताब्यात

SCROLL FOR NEXT