Praniti Shinde criticizes Shinde-Fadnavis  saam tv
लोकसभा २०२४

Maratha Reservation : मराठा तरूण आक्रमक; प्रणिती शिंदेंसमोरच 'एक मराठा, लाख मराठा' घोषणा, रोषामुळं गावातून माघारी फिरल्या

Madha Lok Sabha Constituency Election: मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात येण्यास नेत्यांना‌ बंदी आहे. त्यामुळे तुम्ही गावात थांबू नका असे स्थानिक मराठा समाजातील युवकांनी आमदार प्रणिती शिंदेंनी म्हटले.

भारत नागणे

Pandharpur News:

भाजपला गाव बंदी नाहीतर घर बंदी करा असे आवाहन काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (mla praniti shinde) यांनी मराठा समाजाला केले. आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात (pandharpur vidhansabha) गाव भेटी दौरा सुरू केला आहे. काही गावात मराठा आरक्षण (maratha reservation) मुद्द्यावरून त्यांना गावा येण्यास विरोध हाेऊ लागला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार शिंदेंनी ज्यांनी तुम्हांला फसविले त्यांना गाव नव्हे तर घर बंदी करा पवित्रा घेत मराठा समाजाला आवाहन केले. (Maharashtra News) 

आमदार प्रणिती शिंदे यांच्या दौऱ्या दरम्यान आज (बुधवार) पंढरपूर तालुक्यातील कौठाळी गावात मराठा युवकांनी आरक्षणाच्या मागणीवरून आमदार शिंदे यांच्यासमाेर गोंधळ घातला. कौठाळी गावामध्ये आमदार शिंदे या गेले असता तेथील मराठा समाजातील युवकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यास प्रारंभ केला. मराठा समाजाच्या युवकांचा रोष पाहता आमदार प्रणिती शिंदे यांनी गावातून बाहेर पडणे पसंत केले.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या खरतर विरोध भाजपचा झाला पाहिजे. त्यांनी एक दिवसाचे अधिवेशन घेऊन खेळी केली आहे. उघडं पाडण्याची वेळ आली आहे. भाजप पुन्हा खोटे नाटे सांगून लोकांची दिशाभूल करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही गाव बंदी केली पाहिजे, घरबंदी केली पाहिजे असे त्यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील रवाना

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

SCROLL FOR NEXT