Shrikant Shinde  Saam Tv
लोकसभा २०२४

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde: डोंबिवलीमध्ये एक तारखेला मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मी उपस्थित राहणार, राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय. राज ठाकरेंच्या यांच्या येण्यामुळे महायुतीची ताकद अजून वाढली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Kalyan Lok Sabha:

>> अभिजित देशमुख

डोंबिवलीमध्ये एक तारखेला मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मी उपस्थित राहणार, राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय. राज ठाकरेंच्या यांच्या येण्यामुळे महायुतीची ताकद अजून वाढली आहे. तर राज ठाकरेंची सभा कल्याण लोकसभा मतदारसंघात झाली तर आम्हाला आनंदच असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचा विविध घटक पक्षांच्या मेळावे घेत आहेत. महायुतीच्या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेना टोला लगावला. एकीकडे राज ठाकरे यांनी महायुती पाठिंबा दिलाय ते धनुष्यबाणाला मतदान करणार आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे काँग्रेसच्या हाताच्या पंजाला मतदान करणार आहेत, असं बोलतायत. ही किती मोठी शोकांतिका आहे.

ते म्हणाले, बाळासाहेबांचे विचार विकण्याचं काम राहिलेल्या शिल्लक सेनेने केलंय. त्यांच्या प्रमुखांनी केलं. आज त्यांना जे अनेक वर्ष पाहिजे होतं, ते त्यांनी त्या ठिकाणी केलय. त्यांना पहिल्यापासून काँग्रेस बरोबर जायचं होतं. जी काँग्रेस ची सावरकरांना मानत नाही, सावरकरांना रोज शिव्या देतात त्यांच्या मांडीला उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसतात.

श्रीकांत शिंदे म्हणाले, जे हिंदुत्वाला विसरले जे बाळासाहेबांच्या विचार विसरले त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा आहे. आम्हाला अभिमान आहे, हिंदुत्व बरोबर उभे राहिलो आम्ही बाळासाहेबांचा विचार बरोबर उभे राहिलो. आम्ही सावरकरांच्या विचारांबाबत उभा राहिलो.म्हणून जो आहे धनुष्यबाण आणि शिवसेना जे आहे एकच सामान्य शिवसैनिकाच्या हातामध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे.

सगळे शिवसैनिक हे शिंदे साहेबांसोबत उभे आहेत आणि येणाऱ्या काळात पूर्णपणे ताकतीने हे एकत्रित शिंदे साहेबांच्या सोबत उभे राहतील आणि येणाऱ्या चार तारखेला आणि जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा खऱ्या शिवसेनेबरोबर कशाप्रकारे लोक मजबुतीने उभेच हे तुम्हाला कळेल, असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात ओले केस सुकवण्यासाठी दररोज हेअर ड्रायर वापरताय तर होऊ शकते केसांचे नुकसान; कशी घ्याल काळजी?|Hair Dryer Uses

Loose Motion : पावसाळ्यात 'या' ३ चुका टाळा; नाहीतर जुलाब, अपचन अन् पोटाच्या आजारांचा धोका वाढेल

Skin Care: स्किन खूप ड्राय वाटते? रोज अंघोळीनंतर करा हा २ मिनिटाचा उपाय, त्वचा होईल सॉफ्ट आणि मॉइश्चराई़झ

Maharashtra News Live Update: पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान

Wednesday Horoscope : खर्चावर नियंत्रण ठेवा; 5 राशींच्या व्यक्तींचा बुधवार ठरणार गेमचेंजर; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT