Congress Rebels Join BJP Saam Tv
लोकसभा २०२४

Himachal Politics: लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेसला मोठा धक्का; ६ बंडखोरांसहित ३ अपक्ष आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

Congress Rebels Join BJP : लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर कॉंग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सहा माजी अन् तिन अपक्ष आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Rohini Gudaghe

Himachal Pradesh Politics Updates

हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) सहा माजी अन् तिन अपक्ष आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगमुळे अपात्र ठरलेल्या सहा माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणूकीच्या (lok sabha election) तोंडावरच हिमाचलमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का (BJP Politics) बसला आहे. (latest politics news)

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सहा बंडखोर आमदार आणि तीन अपक्ष आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला (Himachal Pradesh Rajya Sabha Election) आहे. काँग्रेसचे आमदार सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो आणि इंदर दत्त लखनपाल आणि अपक्ष आमदार के एल ठाकूर, होशियार सिंह आणि आशिष शर्मा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विधानसभेच्या एकूण ६८ जागांपैकी काँग्रेसच्या आता ३४ जागा झाल्या आहेत. त्याच वेळी, भाजपची संख्या वाढणार नाही कारण सहा बंडखोर आमदारांना सभापतींनी निलंबित केलं आहे. तर तीन अपक्ष आमदारांनी राजीनामे दिले (Politics News) आहेत. या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विधानसभेच्या एकूण ६८ जागांपैकी काँग्रेसच्या आता ३४ जागा कमी झाल्या आहेत.

राज्यसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या या सहा बंडखोर आमदारांना हिमाचल प्रदेशचे सभापती कुलदीप सिंह पठानिया यांनी अपात्र ठरवलं होतं. ते म्हणाले होते की, पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत या सहा आमदारांविरुद्धची तक्रार आमदार आणि मंत्री हर्षवर्धन यांच्यामार्फत आमच्या सचिवालयाला (Himachal Politics) प्राप्त झाली होती. त्यानंतर त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत निर्णय दिला होता. निलंबित आमदारांनी व्हिपचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालं होतं. २९ फेब्रुवारी रोजी त्यांना अपात्र ठरविण्यात आलं होतं.

हिमाचल प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे ४० आमदार होते. ६८ सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा ३५ आहे. या सहा आमदारांच्या बंडखोरीनंतर विधानसभेतील काँग्रेस आमदारांची संख्या ४० वरून ३४ वर आली (Congress Rebels Join BJP) आहे. ती बहुमतासाठी आवश्यक असलेल्या संख्येपेक्षा एकने कमी आहे. परंतु, बंडखोर आमदारांना सदस्यत्वावरून अपात्र ठरवल्यानंतर आता विधानसभेचे संख्याबळ ६२ झाले आहे. अशा स्थितीत बहुमतासाठी आवश्यक असलेली संख्या आता ३२ झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT