Ghulam Nabi Azad Saam Tv
लोकसभा २०२४

Ghulam Nabi Azad: गुलाम नबी आझाद यांचा यू-टर्न, लोकसभा निवडणूक लढवणार नाही; काय आहे कारण?

Jammu and Kashmir News: गुलाम नबी आझाद यांनी यावेळी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्ष डीपीएपीने (डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी) त्यांना अनंतनाग-राजौरी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.

साम टिव्ही ब्युरो

Ghulam Nabi Azad:

गुलाम नबी आझाद यांनी यावेळी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्ष डीपीएपीने (डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी) त्यांना अनंतनाग-राजौरी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र आता त्यांनी नाव मागे घेतले आहे. गुलाम नबी आझाद यांनी बुधवारी अनंतनाग येथील सभेत ही घोषणा केली. 2 एप्रिल रोजी माजी केंद्रीय मंत्री आझाद यांना अनंतनाग-राजौरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती.

याआधी आझाद यांच्या पक्षाचे प्रवक्ते सलमान निजामी यांनी X वर निवडणूक लढविण्याबाबत पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये निजामी यांनी लिहिले की, "डीपीएपी अध्यक्ष गुलाम नबी आझाद अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. हा निर्णय डीपीएपीने कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे."

अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून गुलाम नबी आझाद यांचा सामना डीपीच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ज्येष्ठ नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मियां अल्ताफ अहमद यांच्याशी झाला असता. नॅशनल कॉन्फरन्स ही इंडिया आघाडीचा एक भाग आहे. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांमध्ये काँग्रेसचाही समावेश आहे.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी आणि तेथील रहिवाशांच्या जमिनी आणि नोकरीच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचं गुमला नबी आझाद म्हणाले होते.

मात्र आता काही दिवसांनी आझाद यांनी यू-टर्न घेतला आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यामागे त्यांच्याकडे अनेक कारणे आहेत, मात्र जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या नोकऱ्या आणि जमिनीचे रक्षण करणे ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे जम्मू-काश्मीरच्या ते म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT