Pritam Munde Saam tv
लोकसभा २०२४

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Pritam Munde News: ज्या रेल्वेच्या भोवताली बीडचे राजकारण फिरत आहे. त्या रेल्वे येण्याला मंदपणा का आला? यावर खासदार प्रीतम मुंडे यांनी पहिल्यांदा जाहीर भाषणातून भाष्य केलंय.

विनोद जिरे

Pritam Munde On MVA Government:

ज्या रेल्वेच्या भोवताली बीडचे राजकारण फिरत आहे. त्या रेल्वे येण्याला मंदपणा का आला? यावर खासदार प्रीतम मुंडे यांनी पहिल्यांदा जाहीर भाषणातून भाष्य केलंय. रेल्वेला का उशीर झाला? याला प्रमुख कारण म्हणजे तब्बल 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला होता. त्यामुळं बीड जिल्ह्यातील रेल्वेचे काम मंद झाले, असा गंभीर आरोप भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

त्याचबरोबर ज्यावेळी महायुतीचे सरकार आले तेव्हा अवघ्या 8 दिवसात सरकारने 200 कोटींचा निधी दिला आणि पुन्हा मंदावलेले रेल्वेचे काम जलदगतीने सुरू झाले,असं वक्तव्य प्रीतम मुंडे यांनी केलंय. त्या बीडमध्ये मातंग समाजाच्या मेळाव्यात बोलत होत्या.

यावेळी प्रीतम मुंडे म्हणाल्या की, तुमच्या मनात निश्चित रेल्वेचा प्रश्न येत असेल. आतापर्यंत 3 तालुके रेल्वेसाठी कव्हर झाले आहेत. आता दोन्ही बाजूने रेल्वेचे काम सुरू होईल. रेल्वेचे काम मंद गतीने सुरू झाले याला सर्वात मोठे जबाबदार म्हणजे आज आपल्या समोर जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत, त्याचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यांनी आपल्या रेल्वेचा निधी एक दोन नव्हे तर तब्बल 3 वर्ष अडवला. पावणेचारशे कोटी रुपये आपल्या रेल्वेचा निधी अडकला होता. म्हणून आपल्या रेल्वेचे काम मंद गतीने झाले.

पण सर्वसामान्य माणसाचे सरकार आले की, कसे बदल होतात ते बघा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले की, 8 दिवसात 200 कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यानंतर आष्टीपर्यंत डेमो रेल्वेचा कार्यक्रम पार पडला. खालून वरपर्यंत एका मतांचे विकासाच्या मतांचे सरकार असेल तर आपल्याला फायदा होईल. त्यामुळं ताईला मतदान करा, असं आवाहन देखील यावेळी प्रीतम मुंडे यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

SCROLL FOR NEXT