Dharashiv Election Voting  Saam Tv
लोकसभा २०२४

Dharashiv Election: भूम तालुक्यातील मतदान केंद्रावर ठाकरे-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; एकाचा मृत्यू

Dharashiv Election Voting: भूम तालुक्यातील पाठसांगवी येथील मतदान केंद्रावर शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय. यात एका कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(बालाजी सुरवसे)

धाराशिव: जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठसांगवी येथे लोकसभेसाठी मतदान चालू असताना एका व्यक्तीवर चाकू हल्ला झाला. या हल्लात २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला. मृत झालेल्या तरुणाचे नाव समाधान नानासाहेब पाटील आहे. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु ही घटना मतदानाच्या अथवा निवडणूकीच्या संदर्भात घडलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हाती आलेल्या माहितीनुसार, मतदान केंद्राच्या बाहेर गौरव उर्फ लाल्या अप्पा नाईकनवरे यांनी समाधान नानासाहेब पाटील यांच्यात वैयक्तिक कारणावरुन वाद झाला होता. या वैयक्तिक वादातून गौरव उर्फ लाल्या अप्पा नाईकनवरे यांनी समाधान पाटील यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं सांगितलं जात होतं. मिळालेल्या माहिती असून मृत्यू झालेला व्यक्ती हा ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात होतं.

आज लोकसभा निवडणुकाच्या मतदानाचा तिसरा टप्पा पार पडतोय. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठसांगवी देखील मतदान होत आहे. येथील मतदानकेंद्रावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर चाकू हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव बाळासाहेब गटाचे ५ ते ६ कार्यकर्ते हल्ल्यात जखमी झालेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ३ ते ४ कार्यकर्त्यांवर शिंदे गटाच्या २० ते २२ कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

सांगोल्यातही दोन गटात हाणामारी

सांगोला तालुक्यातील महूद येथे शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरात हाणामारी झाली यामध्ये दोन्ही गटातील ५ते ६ कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT