Kiran Samant Saam Tv
लोकसभा २०२४

Kiran Samant: देवेंद्र फडणवीस निवडणूक लढू नका म्हणाले, तर मी थांबणार; किरण सामंत स्पष्टच म्हणाले...

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून या जागेवर दावा करण्यात येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency:

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून या जागेवर दावा करण्यात येत आहे. याच जागेवरून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील इच्छूक आहेत. यातच आज ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.

नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर साम टीव्हीशी संवाद साधताना ते म्हणाले आहेत की, ''मी इच्छुक आहे, माझी पूर्ण तयारी आहे. काल उदय सामंत हे भेटून गेले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मला भेटायला बोलावलं असल्यामुळे मी इथे आलेलो आहे. देवेंद्रजी आमचे नेते आहे, त्यामुळे जो काही निर्णय घेईल तो मान्य असेल.''

ते म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमळ चिन्ह निवडणूक लढवली जात आहे. रायगड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे तिथे धनुष्यबाणावर निवडणूक लढवली गेली पाहिजे. त्यासाठी मी इच्छुक आहे, मी गेले अनेक वर्षांपासून उदय सामंत यांच्या पाठीशी राहून काम करत आहे.''

किरण सामंत म्हणाले की, ''मला फक्त परीक्षा द्यायची आहे. 100 पैकी शंभर मार्क मिळेल असा विश्वास आहे. आज नक्कीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर यावर तोडगा निघेल यावर विश्वास आहे.''

'फडणवीस यांनी म्हटलं निवडणूक लढू नका तर मी थांबणार'

सामंत पुढे म्हणाले, ''देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं निवडणूक लढू नका, तर मी थांबणार. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन चर्चा करणार आहे. खरं तर सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेच्याच चिन्हावर लढला गेला पाहिजे. त्याचा फायदा येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होणार आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: कोचकडून महिला खेळाडूवर बलात्कार, हॉटेलवर सरावासाठी बोलावलं अन्...; करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी

'V' Neck ब्लाउजची क्रेझ; साडीला देईल रॉयल लूक, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा शहरात गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

Viral Video : एकमेकींचे केस ओढले, रस्त्यात राडा घातला; प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

Navi Mumbai : नवी मुंबईच्या लॉजमध्ये नको ते उद्योग, पोलिसांनी उद्ध्वस्त केले देहविक्रीचं रॅकेट; ७ महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT