Boxer Vijender Singh Joins BJP: Saamtv
लोकसभा २०२४

Vijender Singh Joins BJP: काँग्रेसला धक्का! बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपमध्ये प्रवेश; लोकसभेच्या रिंगणात उतरणार?

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसकडून 2019 मध्ये दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे बॉक्सर विजेंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे

Gangappa Pujari

Boxer Vijender Singh Joins BJP:

लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसकडून 2019 मध्ये दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे बॉक्सर विजेंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विजेंदर सिंगला काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. त्याआधीच त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

बॉक्सिंगमधून राजकारणात प्रवेश करणाऱ्या विजेंदर सिंगने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आज विजेंदर सिंगने भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. विजेंदर सिंहने 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसने त्यांना दक्षिण दिल्लीतून उमेदवारी दिली होती.

लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससाठी मोठा धक्का आहे कारण हेमा मालिनी यांच्याविरोधात विजेंदर सिंग मथुरा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार असू शकतात, असे मानले जात होते. त्याआधीच त्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपचे कमळ हाती घेतले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून बॉक्सर विजेंदर सिंगने इतिहास रचला होता. या खेळांमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय बॉक्सर होता. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा विजेंदर हा दुसरा भारतीय खेळाडू होता. 2009 मध्ये त्यांना खेलरत्नने सन्मानित करण्यात आले. (Loksabha Election 2024)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna Photos: 'काळी बिंदी काळी कुर्ती घालून ...' रश्मिकांच्या लूकने केलं घायाळ

Highest Collection Movie in India: २०२५ मधील आतापर्यंतचे ७ सर्वात मोठे हिट चित्रपट? कोणत्या फिल्मीने केली जास्त कमाई

राज्याच्या राजकारणाला हादरा! सर्व मंत्र्यांनी एकाचवेळी दिले राजीनामे|VIDEO

Mumbai Rain : मुंबई,ठाण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; नागरिकांची उडाली तारांबळ, VIDEO

Madhura Joshi Photos: हाय गर्मी... मधुराच्या फोटोंनी उडवली झोप, फोटो पाहाच

SCROLL FOR NEXT