damayantiraje udayanraje bhosale comment on opposition in satara lok sabha election
damayantiraje udayanraje bhosale comment on opposition in satara lok sabha election Saam Digital
लोकसभा २०२४

Satara Constituency: उदयनराजेंना शरद पवार प्रखर विराेध करताहेत? दमयंतीराजेंनी स्पष्टच सांगितलं (पाहा व्हिडीओ)

Siddharth Latkar

Damayantiraje Bhosale:

राजघराण्यावर जनतेचे प्रेम आहे. उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांचे देखील जनतेवर खूप प्रेम आहे हे आपण वारंवार पाहत आलाे आहाेत. ते जनतेची कामे करतात. त्यामुळेच आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना जनतेचा भरभरुन उत्साह दिसून येत आहे. उदयनराजेंची किर्ती वाढत असल्यानेच विराेधक त्यांना प्रखर विराेध करीत असल्याचे मत उदयनराजे यांच्या पत्नी दमयंतीराजे भाेसले (Damayantiraje Bhosale) यांनी साम टीव्हीशी एका प्रश्नावर उत्तर देताना नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

सातारा लाेकसभा मतदारसंघात आज (गुरुवार) महायुतीचे भाजपचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले हे रॅलीने त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करीत आहेत. या रॅलीत माेठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

दमयंतीराजे भाेसले म्हणाल्या राजघराण्यावर जनतेचे प्रेम आहे. उदयनराजे हे देखील सातत्याने जनतेवर प्रेम करतात. त्यांची कामे करतात. त्यामुळेच आजही जनतेचा उत्साह दिसून येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान विराेधक विशेषत: ज्येष्ठ नेते शरद पवार हे उदयनराजेंना प्रखर विराेध करीत आहेत या प्रश्नावर दमयंतीराजे म्हणाल्या उदयनराजेंची लाेकप्रियता वाढत आहे. त्याची भीती विराेधकांना वाटत असेल. परिणामी ते तसं करीत असतील. राजकारणात स्पर्धा ही चालतेच. मात्र राजकारणातील स्पर्धा ही निकाेप असावी असेही दमयंतीराजे भाेसले यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: विमानाच्या धडकेत ३० पेक्षा जास्त फ्लेमिंगोचा मृत्यू, मुंबईतल्या घाटकोपरमधील घटना

Health Tips: नखांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके का येतात?

Health Tips: जेवल्यानंतर लगेचच आंघोळ का करू नये, कारण वाचा

Pune Car Accident: मुलगा बेदरकार, बाप जबाबदार! वडिलांनीच कार दिल्याची मुलाची कबुली; बापाला अटक, पबलाही टाळं

Mumbai Metro: मालाड स्थानकाचं नाव बदललं, आता 'मोतीलाल ओसवाल मालाड'च्या नावाने ओळखले जाणार हे मेट्रो स्थानक

SCROLL FOR NEXT