Nana Patole Reaction
Nana Patole Reaction Saam Tv
लोकसभा २०२४

Nana Patole: 'अपघात की घातपात? पोलीस तपासानंतर सत्य समोर येईल'; अपघातानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

Rohini Gudaghe

Nana Patole Reaction On Accident In Bhandara

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या गाडीला भंडारा शहरालगत भीलवाडा गावाजवळ काल रात्री (९ एप्रिल) रोजी अपघात (Nana Patole Accident) झाला होता. यावर त्यांची प्रतिक्रिया समोर आली होते. नाना पटोले (Congress) प्रचार आटोपून सुकळी गावी जात होते, तेव्हा त्यांच्या कारला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली होती. नशीब बलवत्तर म्हणून नाना पटोले थोडक्यात बचावले. तर त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. (Latest Marathi News)

त्यांनी अपघाताबाबत माध्यमांशी बोलताना सांगितलं की, भंडाराजवळ आमच्या गाडीला एक ट्रकने मुद्दामहुन धडक देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गाडी एका बाजूने घासत घासत पुढे गेली. या अपघातामध्ये मला काहीही झालेलं (Nana Patole Reaction On Accident) नाही. परंतु गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. जनतेच्या आशिर्वादामुळे मी व्यवस्थित आहे. या अपघाताबाबत पोलिसांत तक्रार दिलेली आहे. काळजी करण्याचं कारण नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा अपघात आहे की घातपात, याचा तपास पोलीस करत असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. पोलीसांच्या तपासानंतर सत्य काय आहे ते बाहेर येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं (Congress State President Nana Patole) आहे. अपघातासंदर्भात नाना पटोले यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. नाना पटोले यांच्या अपघातासंदर्भात घातापाताच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

नाना पटोलेंच्या अपघातानंतर कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली (Bhandara News) होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का ? असा सवाल त्यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना आहे त्यांचा घातपात करण्याचा (Nana Patole Accident In Bhandara) डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत, अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Petrol Diesel Price: मुंबईसह पुण्यातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा आजच्या किंमती

Sleeping Time: दिवसाला किती तास झोप घ्यावी?

Beetroot Dosa Recipe : सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा बीट डोसा; रंग पाहून लहान मुलं देखील ताव मारतील

Lok Sabha Election |अबब! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात 9 हजार कोटींचा मुद्देमाल जप्त!

SCROLL FOR NEXT