Uddhav Thackeray  Saam TV
लोकसभा २०२४

Sangli Politics : जागावाटपावरुन ठाकरे गट-काँग्रेसमध्ये जुंपली; सांगलीच्या जागेवरुन विश्वजीत कदमांचा थेट उद्धव ठाकरेंना सवाल

Loksabha Election 2024 : जागावाटप अजून झालेले नसताना ठाकरे गटाने सांगलीचा उमेदवार का ठरवला? असा सवाल विश्वजीत कदम यांनी उपस्थित केला.

प्रविण वाकचौरे

Sangli News :

महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा जागेवरुन टोकाचे मतभेद होताना दिसत आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या लोकसभा जागेवर उमेदवाराची घोषणा केली. यावरुन आमदार विश्वजीत कदम यांनी आक्षेप घेत उघडपणे नाराजी व्यक्त केली. सांगली आमचीच आहे, असं म्हणत विश्वजीत कदम यांनी सांगली लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

जागावाटप अजून झालेले नसताना ठाकरे गटाने सांगलीचा उमेदवार का ठरवला? असा सवाल विश्वजीत कदम यांनी उपस्थित केला. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढत आहे. मात्र या सगळ्यात शिवसेनेचे कुरघोडीचे राजकारण घातकी ठरू शकते, अशी भीतीही विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील हेच उमेदवार असतील. विशाल पाटील यांना लोकसभा निवडणुकीत मदत करण्याचा शब्द दिला होता. विशाल पाटील यांना मदत करण्याचं आश्वासन मी त्यांना एक वर्षापूर्वी दिलं होतं. मी शब्द पाळणारा माणूस आहे. त्यामुळे मी विशाल पाटील यांच्या पाठीशी खंभीरपणे उभा आहे, असं विश्वजीत कदम यांनी स्पष्टपणे सांगितलं. (Latest Marathi News)

विश्वजीत कदम यांनी सांगलीच्या जागेवर दावा करताना चंद्रहार पाटील यांना इतर ठिकाणी संधी देण्याचे आश्वासन दिले. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. जातीयवादी शक्तींविरोधात लढण्यासाठी आम्ही आघाडी केली आहे. तसेच चंद्रहार पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. भविष्यात राज्यातील कोणत्याही सभागृहात, विधान परिषदेवर त्यांना संधी देण्यासाठी मी आघाडीतील ३ पक्षांच्या नेत्यांना विनंती करेन आणि त्यासाठी पुढाकार घेईन, असंही विश्वजीत कदम यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pudina Chutney Recipe: उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी पुदीना चटणी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगरनंतर आता नांदेडमध्ये गॅसचा तुटवडा

Blood Pressure : झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण कराच, BP अन् आणि शुगर राहील कंट्रोलमध्ये; नव्या संशोधनातून महत्त्वाची माहिती

America: 'भारतीय चांगले अ‍ॅक्टर', रशियन तेल खरेदीवरून अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरींचं विधान

Viral Video: धक्कादायक अपघात कॅमेऱ्यात कैद! समोरून येणाऱ्या दोन बाईकस्वारांची एकमेकांना धडक, काळजाचा ठोका चुकवणारा Video

SCROLL FOR NEXT