Chhatrapati Sambhajinagar News:  Saamtv
लोकसभा २०२४

Breaking News: प्रचार रॅलीत तुफान राडा! महायुती- ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने; मनसे अन् २००च्या घोषणा| पाहा VIDEO

Chhatrapati Sambhajinagar News: गटाचे कार्यकर्ते आमने- सामने आल्याने हायहोल्टेज ड्रामा झाला. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारानंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Gangappa Pujari

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर, ता. ११ मे २०२४

छत्रपती संभाजीनगरमधून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकांच्या प्रचार रॅली दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह महायुती आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने- सामने आल्याने हायहोल्टेज ड्रामा झाला. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारानंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यांतील निवडणुकांच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार रॅलीदरम्यान हा राडा झाला.

चंद्रकांत खैरे यांच्या रॅलीवेळीच संदिपान भुमरे यांचीही रॅली निघाली आणि दोन्हीकडचे कार्यकर्ते जोरदार घमासान झाले. क्रांती चौकात झालेल्या या राड्या दरम्यान 'मनसे दोनशे'च्या घोषणा देत नोटा दाखवून मनसे कार्यकर्त्यांना डिवचले. यावेळी अंबादास दानवे यांनीही मनसे कार्यकर्त्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाल्याचाही दावा केला जात आहे. मात्र असा प्रकार झाला नसल्याची प्रतिक्रिया संदिपान भुमरे यांनी दिली आहे. तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळेच असा राडा झाल्याचा आरोप करत ४ जूननंतर उत्तर देऊ, अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा पराभव भोवणार, तिघांपैकी कुणाची विकेट पडणार? टीम इंडियात मोठा उलटफेर होणार

Shevgyachya Shenganchi Bhaji Recipe : भाकरी अन् झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी, एक घास खातच येईल गावाची आठवण

Maharashtra Live News Update: पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहिरीत पडला

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

SCROLL FOR NEXT