chetan narke will not contest lok sabha election kolhapur Saam Digital
लोकसभा २०२४

Kolhapur Constituency : गोकुळचे संचालक चेतन नरकेंची लाेकसभा निवडणुकीतून माघार

Chetan Narke News : गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी काही दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार म्हणून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली होती.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

राजकीय जोडण्या करण्यात मी कमी पडलो असे म्हणत गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले. निवडणुकीत माघारीचा निर्णय जाहीर करताना चेतन नरके भावूक झाले हाेते. दरम्यान मी अद्याप कोणाला ही पाठींबा दिलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी काही दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार म्हणून कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान आज त्यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमधून माघार घेतल्याचे सांगितलं.

चेतन नरके हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक हाेते. मात्र महाविकास आघडीने शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी दिली. त्यामुळे चेतन नरके यांनी अपक्ष लढावे असे त्यांच्या समर्थकांची इच्छा हाेती पण आयत्या वेळी चेतन नरके यांनी माघार घेतली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नरके म्हणाले मी राजकीय जोडण्या करण्यात कमी पडलो. मी अद्याप कोणाला ही पाठींबा दिलेला नाही. आगामी काळात जनतेची जितकी सेवा करता येईल तितकी करेन असेही त्यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT