Chandrahar Patil  Saam Digital
लोकसभा २०२४

Chandrahar Patil : पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत पराभव कोणी केला?; चंद्रहार पाटील यांनी केला गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : तुम्ही आज भाजपची बी टीम म्हणून काम करत आहात. त्याचं फळ तुम्हाला आज कॉंग्रेसने उमेदवारी नाकारून दिलं आहे, असा हल्लाबोल चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील यांचं नाव न घेता केला आहे.

Sandeep Gawade

मदन पाटील यांचा जिल्हा बँकेत आणि पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत कोणी पराभव केला, हे संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहिती आहे. कॉंग्रेसने तुम्हाला इतकी वर्षे सांभाळलं. मात्र वसंतदादाचे नातू इतकीच काय ती तुमची ओळख आहे. तरीही प्रामाणिकपणे बंड केला असता तर चाललं असतं. सांगलीच्या जनेतेने तुम्हाला स्वीकारलं असंत. पण तुम्ही आज भाजपची बी टीम म्हणून काम करत आहात. त्याचं फळ तुम्हाला आज कॉंग्रेसने उमेदवारी नाकारून दिलं आहे, असा हल्लाबोल चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील यांचं नाव न घेता केला आहे.

त्याबद्दल आम्ही माफी मागतो- उद्धव ठाकरे

सांगलीचं मन हे नाही म्हटले तर भगवचं आहे. विश्वजीत कदम हे माझे उत्तम सहकारी आहेत.भाजपचं नसतं लचांड गळ्यात आम्ही मारून घेतलं होतं, त्याबद्दल आम्ही माफी मागतो. आघाडी करतो त्यावेळी प्रत्येक पक्षाला त्याच्या मतानुसार कशा जागा भेटतील याचा विचार होता. सांगलीची जागा काँग्रेसकडून गेली, हे मान्य आहे.

विश्वजित कदम तू सांगलीचा इतिहास सांगत होतास. मला बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांची आठवण झाली. सांगलीचे मन भगवे आहे, मध्यंतरी गफलत झाली,आम्हीच मूर्ख होतो. सांगली आपल्याकडून गेली. सांगली जिल्ह्यातील स्वतंत्र वीरांनी बलीदान दिले. ज्यांनी लढ्यात योगदान दिले , त्यांची काय इच्छा होती. बॉम्ब फोडण्यासाठी बैठक झाली, बॉंम्ब कोठे फोडायचे हा विचार सुरू होता ,त्यावेळेस खुदीराम बोस उठून म्हणाला ,मी फोडतो, आणि त्याने इंग्रज अधिकाऱ्यावर बॉंम्ब फोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Ticket: सलग सुट्ट्यांमुळे विमान प्रवास महागला, तिकीटासाठी दुप्पट खर्च; गोवा- चेन्नईसाठी किती पैसे मोजावे लागणार?

मुंबईत मराठी - गुजराती वाद, परप्रांतियाकडून मराठी तरूणाला मारहाण; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: आम्ही विरोधक आहोत म्हणून आम्हाला डावलण्यात येत आहे; वरूण सरदेसाई

Ahaan Panday-Aneet Padda: सैयारा नंतर अहान पांडे आणि अनित पड्डाच्या डेटिंगला सुरुवात? इंटरनेटवर रंगली चर्चा

Broccoli For Brain : स्मरणशक्ती कमकुवत होत चाललीय? ब्रोकोली सारखे सुपरफूड ठरेल रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT