Navneet Rana Saam TV
लोकसभा २०२४

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Amravati Lok Sabha constituency: एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Pramod Subhash Jagtap

Amravati Lok Sabha constituency:

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपली सातवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये नवीन राणा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत त्यांच्या नावाच्या व्यतरिक्त गोविंद करजोल यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांना भाजपने कर्नाटकातील चित्रदुर्ग मतदारसंघातून संधी दिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता त्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये नागपुरात त्या भाजपमध्ये प्रवेश करणार. त्यानंतर नवनीत राणा देशाचे गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दिल्ली येथे भेट घेणार आहेत. (Latest Marathi News)

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चार अपक्ष खासदार विजयी होऊन संसदेत पोहोचले होतं. नवनीत राणाही त्यापैकीच एक आहेत. अमरावती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या नवनीत राणा यांनी 36,951 मतांनी विजय मिळवला होता.

बच्चू कडू यांचा राणांना विरोध

दरम्यान, नवनीत राणा यांच्या उमेदवारीला प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांचा विरोध आहे. तीन दिवसआधीच ते म्हणाले होतं की, ''आम्ही अमरावतीची लोकसभा ही मैत्रीपूर्ण लढत लढत आहोत. सगळ्या कार्यकर्त्यांचं असं मत आहे की, ज्या राणांनी आपल्याला इतकं अपमानित केलं. यातच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, राजकारणात आपण पुन्हा शून्य झालो तरी चालेल, मात्र इतकी शरणागती आपण पत्करायची नाही. राणांचा प्रचार करायचा नाही, अशी कार्यकर्त्यांची मानसिकता आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT