Bhiwandi Lok Sabha Saam Digital
लोकसभा २०२४

Bhiwandi Lok Sabha : भिवंडी मतदारसंघात धक्कादायक प्रकार; हजारो मतदारांची नावं मतदार यादीतून गायब

Lok Sabha Election 2024 : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिममध्ये निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. मतदार यादीमधून हजारो मतदारांची नावं गायब झाली आहेत.

Sandeep Gawade

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिममध्ये निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. मतदार यादीमधून हजारो मतदारांची नावं गायब झाली आहेत. धक्कादायक म्हणजे ज्या मतदारांनी इथून मागे दोन-तीन वेळा मतदान केलं त्या मतदारांचं देखील नाव निवडणुकीच्या यादीतून गायब आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे अवधूत दातार नावाचा तरुण अमेरिकेहून कल्याणमध्ये फक्त मतदानासाठी आला होता, मात्र सकाळी त्याचं नाव मतदार यादीत नसल्याचं पाहून त्याला देखील धक्का बसला आहे. आज सकाळपासून तो विविध मतदान केंद्राच्या फेऱ्या मारत आपलं नाव शोधतोय मात्र अखेर त्याचं नाव कुठेच नसल्याने त्याची निराशा झाली. याबाबत नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरील खर्चात मोठी कपात; सरकारचे किती पैसे वाचणार? समोर आले नवे आकडे

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये मुसळधार पावसाचा फटका; डहाणू–बोर्डी राज्य मार्ग 60 मीटर वाहून गेला, अनेक गावांचा संपर्क तुटला

कारल्यापासून बनवा कुरकुरीत भजी; चहा सोबत लागेल मस्त

Lower Back Pain: दिवसभर बसून काम करता? झोपण्याआधी १० मिनिटं करा 'हा' उपाय; पाठदुखीपासून मिळेल आराम

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा महामार्गावर भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT