Pankaja Munde And Pritam Munde Saam TV
लोकसभा २०२४

Pankaja Munde: नाशिकमधून प्रीतम मुडेंना उमेदवारी? 'त्या' विधानावर पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण; म्हणाल्या...

Pankaja Munde on Nashik Loksabha: 'प्रीतम मुंडेंची काळजी करु नका, मी त्यांना नाशिकमधून उमेदवारी देईन..' असे विधान बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले होते. यावर आता पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले असून सहज हे विधान केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विनोद जिरे

बीड, ता. २७ एप्रिल २०२४

'प्रीतम मुंडेंची काळजी करु नका, मी त्यांना नाशिकमधून उमेदवारी देईन..' असे विधान बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले होते. एकीकडे नाशिकच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच त्यांनी केलेल्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या. यावर आता पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले असून सहज हे विधान केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे आज बीड विधानसभा दौऱ्यावर आहेत. एका मंगल कार्यालयात पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बुथ प्रमुखांचा मेळावा आणि मतदार जागृती अभियान बैठक पार पडली. या बैठकीला पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी नाशिकवरुन केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

"समज होणाऱ्या लोकांच्या ना समजपणाचे हे लक्षण आहे, असे काही नाही. एखादा विषय सहज बोलले. प्रीतम ताईंचे सासर तिकडे आहे. तिकडून स्वागत देखील झाले याबाबत मी अगदी सहज बोलले होते. परंतु त्याचे वेगवेगळे अर्थ काढले गेले. लोकसभा, विधानसभेविषयी तर मी बोललेच नव्हते," असे पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटले.

नाशिकवरुन रस्सीखेच सुरुच..

दरम्यान, नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीमध्ये अद्याप संभ्रम कायम आहे. या जागेवर शिवसेना शिंदे गटाचा अधिकार असून उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असा दावा विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपकडून देखील नाशिकची जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT