bahujan samaj party to contest all seats in konkan says dr prashant ingle saam tv
लोकसभा २०२४

Maharashtra Election 2024: बहुजन समाज पार्टी कोकणातील लोकसभेच्या सर्व जागा लढावणार :डॉ. प्रशांत इंगळे

Konkan Latest Marathi News: लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उल्हासनगर येथे कोकणातील बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

अजय दुधाणे

Bahujan Samaj Party News:

बहुजन समाज पार्टीच्या वतीने ठाणे, भिवंडी कल्याण पालघर समवेत कोकण विभागातील सर्वच्या सर्व 12 लोकसभेच्या जागा लढावणार असल्याची माहिती बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव आणि मुंबई झोन प्रभारी डॉ. प्रशांत इंगळे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. येत्या काही दिवसांत बसपा लोकसभा उमेदवारची यादी जाहीर करेल असेही डॉ. इंगळे यांनी नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उल्हासनगर येथे कोकणातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव आणि मुंबई झोनचे प्रभारी डॉ. प्रशांत इंगळे यांनी बैठकीत विविध विषयांवर कार्यकर्ते, पदाधिकारी यांना मार्गदर्शन केेले. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारा विरोधात बसपा पूर्ण तयारीने लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार आहें असे त्यांनी नमूद केले.

कल्याण लोकसभा मतदार संघात विकासाची कोणती ही कामे झालेले नाहीत. विकासकामांच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप डॉ. प्रशांत इंगळे यांनी केला. बहुजन समाज पार्टी ठाणे, भिवंडी कल्याण पालघर समवेत कोकण विभागातील सर्वच्या सर्व 12 लोकसभेच्या जागा लढावणार असल्याचे इंगळे यांनी स्पष्ट केले. येत्या काही दिवसात बसपा लोकसभा उमेदवारची यादी जाहीर करणार असल्याचे डॉ. प्रशांत इंगळे यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Thackeray Brothers Reunion : १९ वर्षांनंतर राज-उद्धव एकाच मंचावर, राज्यभरातून कार्यकर्ते दाखल, ठाकरेंच्या टीकेचा बाण कुणावर?

SCROLL FOR NEXT