bacchu kadu supports raju shetti in hatkanangale constituency criticises bjp and congress Saam Digital
लोकसभा २०२४

Bacchu Kadu : देशात पक्षांचा राजकीय आतंकवाद वाढत चालला आहे : बच्चू कडू

Hatkanangale Lok Sabha Election : बच्चू कडू यांनी राजू शेट्टींचा शेतक-यांसाठीचा लढा हा अविरत असल्याचे विविध उदाहरण देत नमूद केले. शेट्टींना यंदा लाेकसभेत पाठविण्याचा निर्धार कडू यांनी व्यक्त केला.

विजय पाटील

Sangli Constituency :

आता सगळे जण जात आणि धर्म सांगायला लागेल आहेत. कोणी हिंदू खतरे मे है तर कोणी मुस्लिम खतरे मे है म्हणत आहे पण शेतकरी आणि मजदूर हा खतरे मै आहे असे मत प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (bacchu kadu) यांनी व्यक्त केले. तसेच देशात पक्षाचा राजकीय आतंकवाद वाढत चालला आहे अशी टीका काँग्रेस आणि भाजपावर बच्चू कडू यांनी केली आहे. (Maharashtra News)

बच्चू कडू हे कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (hatkanangale constituency) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी (raju shetti) यांच्या प्रचार निमित्ताने सांगलीच्या शिराळा येथे आयोजिलेल्या सभेत बोलत होते. या सभेत बच्चू कडू यांनी शेट्टींचा शेतक-यांसाठीचा लढा हा अविरत असल्याचे विविध उदाहरण देत नमूद केले.

दरम्यान महायुतीमध्ये बच्चू कडू हे घटक पक्ष म्हणून सामील आहेत मात्र तरी देखील बच्चू कडूंनी थेट हातकणंगले मतदारसंघात येऊन महायुतीच्या उमेदवारा विरोधात लढणा-या राजू शेट्टींना जाहीर पाठिंबा दिली. यामुळे राजकीय वर्तुळात त्याची चर्चा रंगली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेट्टींच्या प्रचारासाठी आलेल्या कडू यांनी जाहीर सभेत भाजप आणि काँग्रेसवर निशाणा साधला. जात आणि धर्म समोर आणल्याशिवाय तुम्हांला निवडणुका जिंकता येत नाहीये इतके तुम्ही पांडू आहात असेही कडू यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT