Asaduddin Owaisi On Lok Sabha elections 2024 Saam Tv
लोकसभा २०२४

Asaduddin Owaisi: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी MIM किती उमेदवार उभे करणार? असदुद्दीन ओवैसी यांनी दिलं उत्तर

Lok Sabha elections 2024: एमआयएम पक्षाने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवार जाहीर केला. येथील सीटिंग खासदार इम्तियाज जलील यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> रामू ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha:

एमआयएम पक्षाने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवार जाहीर केला. येथील सीटिंग खासदार इम्तियाज जलील यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. यातच एमआयएम राज्यात किती उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवणार आहे, याचे उत्तर पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी दिलं आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, ''आम्ही सध्या फक्त हैदराबाद, संभाजीनगर आणि किशनगंजमधून उमेदवारी जाहीर केलेले आहेत. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी उमेदवार उभे राहील, हे सुद्धा लवकरच इम्तियाज जलील अधिकृतपणे जाहीर करतील.''  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीबद्दल बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, ''कोणी कोणाला भेटू दे. त्याशी मला काही घेणं-देणं नाही.  (Latest Marathi News)

सध्या देशात गज आलेल्या इलेक्टोरल बॉन्डसच्या मुद्द्यावर ते म्हणाले, ''सगळ्या पक्षांना करोडो रुपये मिळाले. मात्र आम्हाला एक रुपयाही न मिळता असं म्हटलं जातं की, तुम्ही भाजपची बी टीम आहे. तरीसुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांगतात की न खाऊंगा आणि नखाने दूंगा. सगळ्यात जास्त इलेक्टोरल बॉन्डस हे हैदराबादमध्ये खरेदी झालेले आहेत. मात्र आम्ही हैदराबादचे असून सुद्धा आम्हाला काही मिळालं नाही.''

'अब की बार 400 पार' भाजपच्या या घोषणेवर ते म्हणाले की, ''संभाजीनगरमधून पुन्हा एकदा इम्तियाज जलील हेच दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून जातील, असा मला विश्वास आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत अजून आम्ही कोणत्याही प्रकारची चर्चा केलेली नाही. मी आधी हेच सांगत होतो आणि आताही हेच सांगत आहे की, मी आणि इम्तियाज जलील त्याबरोबरच पक्षाचे काही पदाधिकारी पक्षासाठी चांगलं काम करत आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सांगली-मिरजला पावसाने झोडपले,

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT