Andhra Pradesh 7 Crore Seized:  Saamtv
लोकसभा २०२४

Andhra Pradesh: खळबळजनक! नोटांनी भरलेले वाहन उलटले; रस्त्यावर नोटांच्या बंडलांचा खच|VIDEO

Andhra Pradesh 7 Crore Seized: आंध्र प्रदेशमध्ये पैशाने भरलेले वाहन पलटी झाल्याची घटना घडली. यावेळी गाडीतून तब्बल ७ कोटींच्या नोटांचा ढीग रस्त्यावर पडला. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आंध्र प्रदेशमध्ये पैशाने भरलेले वाहन पलटी झाल्याची घटना घडली. यावेळी गाडीतून तब्बल ७ कोटींच्या नोटांचा ढीग रस्त्यावर पडला. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

आंध्र प्रदेशात शनिवारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. पूर्व गोदावरी जिल्ह्यात कार्डबोर्ड बॉक्समध्ये 7 कोटी रुपये लपवून घेऊन जात होते. मात्र नल्लाजरला मंडलातील अनंतपल्ली येथे एका ट्रकला धडकल्यानंतर टाटा एस वाहन उलटले आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.

विजयवाडाहून विशाखापट्टणमच्या दिशेने हे वाहन जात असताना ही घटना घडली. या गाडीमध्ये 7 पुठ्ठ्याचे बॉक्स जात असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. जप्त केलेली रक्कम सुमारे 7 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गोपालपुरम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, याआधी शुक्रवारीही आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. याठिकाणी तपासणी करताना पोलिसांनी पाईपने भरलेल्या ट्रकमधून सुमारे 8 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. ट्रक आणि पैसे जप्त करण्यासोबतच त्यात प्रवास करणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phaltan Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी PSI बदनेचे लोकेशन सापडलं, कुठं लपून बसला?

Thamma Cast Fees : रश्मिका मंदाना की आयुष्मान खुराना; 'थामा'साठी कोणी घेतलं तगडे मानधन?

BEL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार १ लाख ४० हजार रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

दिवाळीनंतर सोन्याचे भाव वधारले; चांदीचा दर जैसे थे, आठवड्याच्या शेवटी सोनं कितीनं महागलं?

SCROLL FOR NEXT