anup dhotre google
लोकसभा २०२४

Akola Lok Sabha Election Result: अकोल्यात कमळ फुललं! तिरंगी लढतीत अनुप धोत्रेंचा विजय, प्रकाश आंबेडकरांचा पराभव

Anup Dhotre, Lok Sabha Election Result: अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अनुप धोत्रे यांनी जोरदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये टफ फाईट पाहायला मिळाली. मतमोजणीत भाजपचे अनुप धोत्रे आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले होते. अखेर अनुप धोत्रे यांनी काँग्रेसच्या अभय पाटील यांना पराभवाची धूळ चारत दणदणीत विजय मिळवला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात अनुप धोत्रे,अभय पाटील आणि वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. अखेर अनुप धोत्रे यांनी मोठी आघाडी घेत प्रकाश आंबेडकर आणि अभय पाटील यांचा पराभव केला आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात हा भाजपचा सलग चौथा विजय ठरला आहे. यापूर्वी २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत संजय धोत्रे यांना भाजपकडून उमेदवारी दिली गेली होती. तिन्ही वेळेस भाजपने आपला गड राखत शानदार विजय मिळवला होता. तर प्रकाश आंबेडकर हे विरोधात होते. या तिन्ही वेळेस प्रकाश आंबेडकरांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

यावेळी भाजपने संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना उमेदवारी दिली. हा विश्वास सार्थ ठरवत त्यांनी पुन्हा एकदा आपला गड राखला आहे. या निवडणूकीत अनुप धोत्रे यांनी प्रकाश आंबेडकर आणि अभय पाटील यांना पराभूत केलं आहे. मतमोजणीत अनुप धोत्रे यांनी पंधराव्या फेरीपर्यंत ११ हजार ८८९ मतांची आघाडी घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upcoming Film: PM मोदींच्या भूमिकेत हा सुपरस्टार दिसणार; तर रवीना टंडन साकारणार आईची भूमिका, सिनेमा कधी प्रदर्शित होणार?

Palak Puri Tips: पुरी फुगतच नाही? खूप तेल पितात? पिठात घाला 'हा' पदार्थ, परफेक्ट पुऱ्यांचं सिक्रेट

Bihar Election Result : बिहारचा मुख्यमंत्री ठरला! नितीश कुमारच होणार CM, एनडीएच्या बड्या नेत्याचं मोठं विधान

Winter Skin Care: हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची?

Bihar Election Result Live Updates : नाचता येईना,अंगण वाकडे; चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर टीका

SCROLL FOR NEXT