मंगेश कचरे साम टिव्ही, बारामती
आज शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar)यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात सभा आहेत. बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांना चव्हाण साहेबांनी राजकारणात येण्याची संधी दिली. मला शरद पवारांनी राजकारणात येण्याची संधी दिली. 1987 पासून आतापर्यंत साहेब म्हणतील तीच भूमिका आम्ही घेतली आहे.
जिल्हा परिषद, साखर कारखाने आणि इतर संस्था कशा साहेबांच्या ताब्यात राहतील यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. संधी मिळाल्यावर माणूस काम करतो. तुम्हाला देखील चव्हाण साहेबांनी संधी दिली, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. कोंबड कितीही झाकून ठेवलं तरी ते बाग द्यायचं चुकत नाही, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
परवा मी मोदी साहेबांशी चर्चा करत होतो. नुसत्या गप्पा मारत नव्हतो, तर विकासाच्या चर्चा करीत (Lok Sabha 2024) होतो. मोदी म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील चारही खासदार निवडून आणा तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देतो. देशात तीन कोटी देशात घरकुले बांधणार आहोत.
1962 मध्ये शरद पवार (Sharad Pawar)एकीकडे होते आणि अख्खं घराणं एका बाजूला होतं. तरी शरद पवार निवडून आले होते. यावेळी देखील असंच होणार आहे. अख्ख घराणं माझ्याविरोधात आहे. परंतु माझाच उमेदवार निवडणून (Maharashtra Election) येणार आहे. तुमच्या घरात सून आली.? चाळीस वर्षे राहिले तरी तुम्ही तिला बाहेरची समजाल का? असा प्रश्न देखील यावेळी अजित पवारांनी विचारला आहे.
ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी (Maharashtra Politics) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पाहिजे का राहुल गांधी? हा निर्णय जनतेने घ्यायचा आहे. तुम्ही लोकांनी 1984 मध्ये मला निवडून दिलं. कारखान्याचं डायरेक्टर केलं. तिथून माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. आज आम्ही सर्व विरोधक विकासासाठी एकत्र आलो असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी बारामतीमध्ये केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.