Ahmednagar Lok Sabha Election  Saam TV
लोकसभा २०२४

Ahmednagar Lok Sabha: ओबीसींनी ओबीसीलाच सहकार्य करा, भर चौकात झळकले बॅनर्स; राजकीय वर्तुळात खळबळ

Ahmednagar Breaking News: ओबीसींनी ओबीसीलाच सहकार्य करा, अशा आशयाचे बॅनर्स अहमदनगरमध्ये झळकले आहेत. शहरात ठिकठिकाणी हे बॅनर्स लागलेले आहेत.

Satish Daud

Ahmednagar Lok Sabha Election

राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ओबीसींनी ओबीसीलाच सहकार्य करा, अशा आशयाचे बॅनर्स अहमदनगरमध्ये झळकले आहेत. शहरात ठिकठिकाणी हे बॅनर्स लागलेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ही बॅनरबाजी नेमकी कुणी केली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अहमदनगर (Ahmednagar) शहरात लावण्यात आलेल्या पिवळ्या रंगाच्या बॅनर्सवर मफलर परिधान केलेल्या माणसाचे चित्र आहे. याशिवाय बॅनरवर महापुरुषांचे देखील फोटो आहे. ओबीसींनी ओबीसीलाच सहकार्य करा, असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे.

सध्या हे बॅनर्स चर्चेचा विषय ठरत आहे. या बॅनर्समुळे राजकीय नेत्यांसह लोकसभा उमेदवारांचं चांगलंच टेन्शन वाढलंय. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत. अहमदनगरमध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील असा सामना रंगणार आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीने सुजय विखे पाटील तर महाविकास आघाडीने माजी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही नेत्यांकडून सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. त्यातच शहरात ओबीसीलाच सरकार्य करा, अशा आशयाचे बॅनर्स लागल्याने या सामना आणखीच रंगतदार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत पाडा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं होता. आता अहमदनगरमध्ये हे बॅनर्स लागल्याने निवडणुकीत ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! कारगिल युद्ध लढलेल्या सैनिकाकडे मागितला नागरिकत्त्वाचा पुरावा; घरात घुसून ८ जणांच्या टोळक्याकडून शिवीगाळ?

Mumbai Shocking News : शिक्षक की राक्षस? खराब अक्षरामुळे ८ वर्षांच्या मुलाला दिले मेणबत्तीचे चटके

Maharashtra Live News Update: अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला

माणिकराव कोकाटे सभागृहात किती वेळ रम्मी खेळत होते? रोहित पवारांनी वेळेचा आकडाच सांगितला|VIDEO

Rajnikanth News : रजनीकांत वर्तमानपत्र उचलायला वाकले अन् तोंडावर आपटले; चाहत्यांची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT