abhijeet bichukale to contest satara lok sabha election against udayanraje bhosale and shashikant shinde saam tv
लोकसभा २०२४

Satara Constituency : चर्चा तर हाेणारच! बारामतीच्या चव्हाणांचा सातारा लाेकसभा मतदारसंघात अर्ज दाखल, बिचुकलेंनी ठाेकला शड्डू

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सा-या राज्याचे लक्ष सातारा लोकसभा मतदारसंघाकडे लागून राहिले आहे. या मतदारसंघात अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

ओंकार कदम

Satara Lok Sabha Election 2024 :

सातारा लोकसभा मतदारसंघात (satara constituency) अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी बारामती येथील एकाने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान या मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले (mp udayanraje bhosale), आमदार शशिकांत शिंदे (mlc shashikant shinde) , अभिनेते डाॅ. अभिजीत बिचुकले (abhijeet bichukale) यांच्यासह एकूण 30 जणांनी 55 अर्ज नेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सा-या राज्याचे लक्ष सातारा लोकसभा मतदारसंघाकडे लागून राहिले आहे. या मतदारसंघात भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे महायुतीकडून निवडणुक लढण्यास इच्छुक आहेत. अद्याप उदयनराजेंच्या अधिकृत उमेदवारीबाबत शिक्कामाेर्तब झालेला नाही. दूसरीकडे त्यांनी निवडणुक लढविण्यासाठी प्रशासनाकडून अर्ज घेतला आहे.

महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आमदार शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी सातारा ते कराड अशी रॅली काढत त्यांच्या प्रचारास प्रारंभ केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बारामतीतून सातारा लाेकसभा मतदारसंघात अर्ज दाखल

याबराेबरच नेहमीच वेगवेळ्या निवडणुकीत लढणारे अभिनेते अभिजीत बिचुकले यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. सातारा लाेकसभा मतदारसंघात एकूण 30 जणांनी 55 अर्ज नेले आहेत. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे राहुल गजानन चव्हाण (रा. वानेवडी ता.बारामती) यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT