Instagram Followers Trics social media
लाईफस्टाईल

Instagram:'या' कारणामुळे नाही वाढत तुमचे Instagram वरील Followers; 'या' ट्रिक्सने व्हायरल करा कटेंट

Followers Tricks: जगभरात २ अब्जाहून अधिकजण इस्टाग्राम वापरत आहेत. परंतु अनेक फॉलोअर्स लोकांना त्याच्या पोस्ट व्हायरल करता येत नाहीयेत. त्यांचे फॉलोअर्स देखील वाढत नाहीयेत. फॉलोअर्स कसे वाढवावे हे आपण आज जाणून घेऊ...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Instagram Followers Tricks:

जगभरात आज इंस्टाग्रामचे २ अब्जाहून अधिक मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. कंपनीने प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्राम रील करण्याची सुविधा दिली तेव्हापासून या अॅपची लोकप्रियता अधिक वाढली. काही कटेंट क्रिएटर्स याद्वारे प्रचंड पैसे कमावत आहेत. परंतु असे काही जण आहेत त्यांचे फॉलोअर्स वाढत नाहीयेत. (Latest News)

बहुतेक लोकांसमोर ही समस्या बनलीय की, त्यांचे फॉलोअर्स कसे वाढवावे? दररोज कटेंट पोस्ट केला तरीही फॉलोअर्स वाढत नाहीत काय कारण आहे, असा प्रश्न त्यांना पडतोय. फॉलोअर्स न वाढण्यामागे तुमच्याकडून काही चुका होत असतील. त्यामुळे तुमचे फॉलोअर्स वाढत नाहीयेत. इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढवणे ही एक कठीण आणि वेळ घेणारी प्रक्रिया आहे. आज आपण फॉलोअर्स कसे वाढवावे हे जाणून घेऊ...

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ट्रेंड फॉलो करा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काहीही पोस्ट केल्यानंतर तुमचे फॉलोअर्स वाढावेत असे तुम्हाला वाटत असेल तर काही गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजेत. तुम्ही कोणत्या प्रकारचा कटेंट तयार करता? त्यावर फॉलोअर्स वाढण्याचं प्रमाण अवलंबून असतं. जर तुम्ही चांगले मजेदार कटेंट तयार करत असाल तर त्यावर लक्ष केंद्रित करत तसे कटेंट तयार करा. यासह प्लॅटफॉर्म तुमचा कटेंट बघत असतो त्यानंतर त्याला पुश देत असतो. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल होण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही प्रत्येक कॅटेगरी लक्षात घेऊन कटेंट तयार करत असाल तर ते व्हायरल होण्याची शक्यता कमी असते.

बायो ऑप्टिमाइझ करा

फॉलोअर्स वाढवण्यासाठी इस्टाच्या बायो प्रोफाईलमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. कूल डुड, प्ले बॉय सारख्या गोष्टी तुम्ही तुमच्या बायो मध्ये लिहून नका. त्याऐवजी तुम्ही येथे तुमच्याबद्दल काहीतरी चांगल्या गोष्टीची माहिती लिहा.जेणेकरून तुमच्या खात्यावर नवीन युझर आला तर त्याला संपूर्ण माहिती मिळेल. शक्य तितकं असेल तर काही अनोखे बायो ठेवा जेणेकरुन समोरची व्यक्ती तुमचा बायो वाचून तेथे थांबेल. तुम्ही येथे तुम्ही तुमची आवड देखील सांगू शकता. तुम्ही तुमच्या कामाबद्दलही सांगू शकता. जेणेकरून लोक तुमच्याशी सहज कनेक्ट होऊ शकतील.

हॅशटॅगचा योग्य वापर

Instagram वरील हॅशटॅग या प्लॅटफॉर्मचे फॉलोअर्स वाढण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. हॅशटॅग असे वापरा जे सध्या ट्रेंड करत आहेत. परंतु आजही बरेच युझर्स आहेत जे कटेंट व्हायरल होण्यासाठी खूप जास्त हॅशटॅग वापरतात. परंतु ते पूर्णपणे चुकीचे आहे. जर पोस्ट खाण्याबद्दल असेल आणि हॅशटॅग मजेदार रील असं केले असेल तर तुमचा कटेंट कधी व्हायरल होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT