कटिचक्रासन  Saam tv
लाईफस्टाईल

Daily योग: कटिचक्रासन कसे करावे?

सावधान स्थितीत उभे रहावे. श्वास घेत दोन्ही हात सरळ पुढे, तळहात एकमेकांकडे करून जमिनीला समांतर करावे.

साम टिव्ही ब्युरो

कटिचक्रासन

या आसनामुळे कंबरेला योग्य प्रमाणात ताण मिळतो आणि त्याची लवचिकता वाढते. हे आसन कसे करावे आणि त्याचे इतर फायदे कोणते ते जाणून घेऊयात..

कटिचक्रासन कसे करावे?

सावधान स्थितीत उभे रहावे. श्वास घेत दोन्ही हात सरळ पुढे, तळहात एकमेकांकडे करून जमिनीला समांतर करावे. दोन्ही तळहातांमध्ये खांद्याएवढे अंतर असणे आवश्यक आहे. श्वास सोडत कंबरेला पीळ देऊन हळुवार उजवीकडे वळा. उजव्या खांद्यावरून मागे पहा. हे करताना आपले पाय जमिनीवरून अजिबात हलू देऊ नका. त्यामुळे कंबरेला चांगला पीळ बसेल. तळहातातील अंतर एकसारखे राहू द्या. काही सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर श्वास घेत समोर या आणि पुन्हा हिच क्रिया डाव्या बाजूला वळत करा.

कटिचक्रासनाचे फायदे कोणते?

- अपचन दूर होण्यास अत्यंत उपयुक्त असे हे आसन आहे.

- कंबर आणि मणक्याची लवचिकता वाढते.

- मान आणि खांद्याचे स्नायू मोकळे होतात. पोटातील आणि कंबरेचे स्नायू बळकट होतात.

- बैठे काम असणाऱ्यांसाठी हे आसन फायदेशीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : निरोगी आयुष्यासाठी दिवसातून किती चपाती खाव्यात? जाणून घ्या

Ahilyanagar Tourism : नगरमध्ये निसर्गाच्या कुशीत लपलाय भव्य किल्ला; इतिहास वाचून अभिमान वाटेल, एकदा जाऊनच या

Rinku Rajguru : "मी आरपार प्रेम करते..."; ब्रेकअपवर रिंकू खूप काही बोलली, 'त्या' नात्याबद्दल नेमकं काय म्हणाली?

Shocking : पुणे हादरलं! आई आणि भावासमोर मुलीचे अपहरण, डोळ्यात मिरची पावडर फेकली, अन्...

EPFO News: पीएफवरील व्याजदर वाढवणार? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT