Yoga For Stamina Saam Tv
लाईफस्टाईल

Yoga For Stamina : स्टॅमिना वाढवायचा आहे? आजपासूनच ही 7 योगासने सुरू करा

Growth Stamina : चुकीच्या खाण्यापिण्याच्या आणि राहण्याच्या सवयींमुळे लोकांचा स्टॅमिना खूपच कमी होऊ लागतो.

Shraddha Thik

Yoga Tips :

चुकीच्या खाण्यापिण्याच्या आणि राहण्याच्या सवयींमुळे लोकांचा स्टॅमिना खूपच कमी होऊ लागतो. स्टॅमिना वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला 7 योगासनांविषयी सांगत आहोत.

योग ही भारतातील सर्वात प्राचीन पद्धतींपैकी एक आहे. तथापि, काही लोक योग (Yoga) आणि प्राणायाम दोन्ही समान मानतात. योगामुळे तुमच्या शरीराचे संतुलन, स्टॅमिना आणि शारीरिक क्षमता सुधारते. आम्ही 7 योग आणि आसनांबद्दल बोलणार आहोत जे शरीरावर त्यांच्या प्रभावाविषयी माहिती देतील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शरीराची अंतर्गत ताकद किंवा सहनशीलता (प्रतिकारशक्ती) वाढवण्यासाठी अनेक योग आणि आसने उपलब्ध आहेत, ज्यांचा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात समावेश करून बदल अनुभवू शकता. संतुलित आहारासोबत या आसनांचा नियमित सराव केल्याने आपल्या शरीरावर चांगले परिणाम होतात. काही योगासने जाणून घेण्यासाठी पुढे वाचा ज्यामुळे तग धरण्याची क्षमता वाढेल.

सूर्यनमस्कार

हा एकूण 12 आसनांचा संच आहे ज्यामध्ये शरीराच्या संपूर्ण अवयवांच्या हालचालींचा समावेश होतो. या आसनामुळे तुमची हृदय व रक्तवाहिन्यांची क्षमता वाढते.

वृक्षासन

हे आसन तुमचा मणका मजबूत करते ज्यामुळे शरीराचे संतुलन सुधारते. सपाट पायांमुळे होणाऱ्या समस्यांमध्येही हे फायदेशीर (Benefits) आहे.

भुजंगासन

या आसनामुळे शरीरातील स्नायू मजबूत होतात. शरीरातील लवचिकता वाढते. तणाव आणि थकवा दूर करण्यात मदत होते आणि यासोबतच हृदय निरोगी ठेवण्यासही हे उपयुक्त आहे.

नौकासन

हे सोपे आसन आपले स्नायू मजबूत करते. त्याच्या रोजच्या सरावाने पाठ, पोट आणि पाय यांचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. आपली पचनसंस्था सुधारण्यास आणि आळस दूर करण्यास उपयुक्त ठरेल.

धनुरासन

हे आसन कंबरेची लवचिकता वाढवण्यास मदत करते, संपूर्ण पाठ ताणते, ज्यामुळे कंबर मजबूत होते.

उस्त्रासन

याचा सराव केल्याने शरीराचे खांदे आणि कंबर मजबूत होते. शरीराला लवचिकता देण्यासोबतच थकवा, चिंता इत्यादी दूर करते.

त्रिकोनासन

शरीराचा समतोल राखण्यासोबतच ताकदही मिळते. पचनाच्या समस्या, अ‍ॅसिडीटी यांसारख्या पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हे फायदेशीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT