Yoga For Men Saam Tv
लाईफस्टाईल

Yoga For Men : पुरषांच्या आरोग्यासाठी बेस्ट ठरतील ही तीन योगासने, जाणून घ्या

Daily Yoga For Men's : योगासने प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. व्यग्र जीवनशैलीमुळे लोकांना विविध आजारांचा धोका निर्माण होतो. वय आणि लिंगानुसार शारीरिक समस्यांमध्ये काही फरक असू शकतो.

Shraddha Thik

Yoga Tips :

योगासने प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. व्यग्र जीवनशैलीमुळे लोकांना विविध आजारांचा धोका निर्माण होतो. वय आणि लिंगानुसार शारीरिक समस्यांमध्ये काही फरक असू शकतो. उदाहरणार्थ, स्त्रिया आणि पुरुष वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांनी ग्रस्त होऊ शकतात. अशा स्थितीत पुरुष आणि महिलांसाठी (Women) वेगवेगळे योगासने आहेत. पुरुषांनी त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करावा.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एका अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत महिलांच्या तुलनेत पुरुषांमधील तणावाची पातळी वाढली आहे. नैराश्यामुळे पुरुषांना (Men) अनेक आजार होतात. अशा स्थितीत मन शांत ठेवण्यासाठी आणि रोगांपासून दूर राहण्यासाठी पुरुषांनी काही योगासनांचा नियमित सराव केला पाहिजे. येथे तुम्हाला पुरुषांसाठी फायदेशीर (Benefits) योगासनांबद्दल सांगितले आहेत.

कपालभाती प्राणायाम

तुम्ही बाबा रामदेव यांना कपालभाती प्राणायाम करताना पाहिले असेलच. ते अनेकदा या प्राणायामाच्या सरावाची शिफारस करतात. कपालभाती प्राणायाम केल्याने वजन नियंत्रित राहते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. याशिवाय पोटाशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळतो. या क्रियेने श्वासासंबंधीच्या समस्या दूर होऊन फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते.

नौकासन

नौकासनाचा सराव पुरुषांसाठी फायदेशीर आहे. बर्‍याच मुलांना अ‍ॅब्स बनवण्याची आवड असते. नौकासनाचा सराव करून अ‍ॅब्स तयार करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. या आसनाने पाठीचा कणा लवचिक होतो. नौकासनाचा सराव प्रोस्टेट ग्रंथीला उत्तेजित करतो.

बालसन

दिवसभर ऑफिसमध्ये बसल्याने लोकांच्या पोट वाढले आहे. बालासनाच्या सरावाने पोटाची चरबी कमी होते. याशिवाय, शरीराची स्थिती सुधारण्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठी आणि नैराश्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही बालासनाचा सराव देखील करू शकता. बालासनामुळे पाठ आणि मानेच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो.

अधो मुख स्वानासन

अधो मुख स्वानासनाच्या सरावाचे पुरुषांना खूप फायदे आहेत. पुरुषांनी हा योग नियमित करावा. अधो मुख स्वानासनाच्या सरावाने खालच्या ओटीपोटाचे स्नायू मजबूत होतात. पचन सुधारते, रक्त वाहिन्यांचे यंत्रणा वाढवते आणि तणावावर मात करण्यास मदत करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : कोकणातील खास आकर्षण; पावसाळ्यात आवर्जून फिरा रत्नागिरीतील 'हे' २ समुद्रकिनारे

Maharashtra News Live Update: प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची १२ तास चौकशी

गुगलवर हत्येचे पर्याय शोधले, लोहगडवरून ढकलण्याचा सराव केला; केतन अग्रवाल खून प्रकरणाचा थरारक उलगडा

TET Exam Update : आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलली, दिल्ली कनेक्शन आणि दीड कोटींचा व्यवहार; मोठी अपडेट समोर

भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT