World Environment Day 
लाईफस्टाईल

World Environment Day 2024: जगभरात जागतिक पर्यावरण दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्त्व

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगभरात ५ जूनच्या दिवशी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश निसर्गाशी संबंधित समस्यांबद्दल जास्तीत जास्त लोकांना जागरुक करणे, हा असतो. पर्यावरणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी पर्यावरण दिन साजरा केला जातो.

जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्र संघाने १९७२ साली स्टॉकहोम परिषदेत घेतला गेला. 'पर्यावरण संरक्षण' हा या परिषदेचा विषय होता. या परिषदेमध्येच दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला. ५ जून १९७४ रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. यादिवशी 'एक पृथ्वी' ही जागतिक पर्यावरण दिनाची थीम निश्चित करण्यात आली होती.

जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व

आजकाल भारतासह संपूर्ण जगभरात प्रदूषण वेगाने वाढत आहे. याचे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. वाढत्या प्रदूषणापासून निसर्गाचे सरंक्षण करण्यासाठी पर्यावरण दिन सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी लोकांना निसर्गाचे आपल्या आयुष्यात काय महत्त्व असते, हे सांगितले जाते. पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी या बद्दल सूचित केले जाते. पर्यावरण प्रदूषित होण्यापासून वाचवण्यासाठी लोकांना प्रवृत्त केले जाते.

जागतिक पर्यावरण दिनाची थीम

२०२४ची जागतिक पर्यावरण दिनाची थीम 'जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळ लवचिकता.' अशी आहे. 'आमची जमीन' अशी घोषणा करत जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malvan Statue Incident: मालवणमधील शिवरायांचा पुतळा दुर्घटनेत मोठी कारवाई! उत्तर प्रदेशमधून तिसऱ्या आरोपीला अटक; पोलीस कोठडीत रवानगी

PM Kisan Yojana: बळीराजासाठी केंद्राची खास योजना! मिळतात ६ हजार रुपये; जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rahu Nakshtra Gochar: राहुच्या नक्षत्र गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; नव्या नोकरीसह मिळणार अफाट पैसा

SCROLL FOR NEXT