World Cotton Day 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

World Cotton Day 2023 : जागतिक कापूस दिवस का साजरा केला जातो? उद्देश काय? जाणून घ्या महत्त्व आणि थीम

Why celebrate World Cotton Day : कापसाचे उत्पादन केवळ भारतातच नाही तर जगभरात मोठ्या प्रमाणावर होते.

Shraddha Thik

World Cotton Day :

कापसाचे उत्पादन केवळ भारतातच नाही तर जगभरात मोठ्या प्रमाणावर होते. हा उद्योग लोकांसाठी रोजगाराचाही मोठा स्रोत आहे. कपड्यांव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींमध्ये कापूस वापरला जातो.

सुती कपडे (Coths) आरामदायक आणि टिकाऊ असतात. आज 7 ऑक्टोबर हा दिवस जगभरात कापूस दिवस म्हणून साजरा केला जातो. या खास प्रसंगी, या दिवसाच्या सेलिब्रेशनची सुरुवात कशी झाली आणि या वर्षाची थीम काय आहे हे जाणून घेऊया.

इतिहास

07 ऑक्टोबर 2019 रोजी प्रथमच कापूस (Cotton) दिवस साजरा करण्यात आला. ज्याची सुरुवात बेनिन, बुर्किना फासो, चाड आणि माली या चार देशांनी संयुक्तपणे केली होती. त्यांनी 2019 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत जागतिक कापूस दिवस स्थापन करण्याचा अधिकृत प्रस्ताव मांडला होता. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जाऊ लागला.

थीम

जागतिक कापूस दिवस दरवर्षी नवीन थीमसह साजरा (Celebrate) केला जातो. यावर्षीही त्याची थीम ठेवण्यात आली आहे, 'Making cotton fair and sustainable for all, from farm to fashion' अर्थात 'शेतीपासून फॅशनपर्यंत सर्वांसाठी कापूस योग्य आणि टिकाऊ बनवणे.'

उद्देश

जागतिक कापूस दिनानिमित्त अनेक प्रकारचे कार्यक्रम आणि जनजागृती मोहीम राबवली जाते. ज्याचा उद्देश कापूस उत्पादन वाढवण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ते सर्व बदल करणे, त्याच्या उत्पादनासाठी आवश्यक तंत्रज्ञानासाठी सुविधा उपलब्ध करून देणे आणि कापूस व्यवसायात गुंतलेल्या कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी कार्य करणे हा आहे. त्यांना रोजगारही उपलब्ध करून देतो.

महत्त्व

लोकांमध्ये एवढी लोकप्रियता असूनही कापूस व्यवसायाला जेवढे महत्त्व आणि सुविधा द्यायला हव्यात तेवढे मिळत नाही. कापूस उद्योग केवळ कपडेच बनवत नाही तर तो अनेक लोकांसाठी रोजगाराचा स्रोत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांकडून २५ लाखांचा हप्ता? शिवसेना शहरप्रमुखांचा KDMC अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: कोपरगावमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर; पुरवठा विभागाची कारवाई, 19 सिलिंडर जप्त

Fansachi Sukhi Rhaji Recipe : कोकणी मेजवानी! कोवळ्या फणसाची सुकी भाजी कधी खाल्लीय का? एकदा चव चाखाल तर खातच राहाल

Crime: १७ वर्षीय मुलाकडून ३ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, व्हिडीओ काढून ब्लॅकमेल; १ पीडिता गरोदर

Chanakya Niti: दिसायला भोळे पण प्रत्यक्षात खूप चतूर असणारे मित्र कसे ओळखायचे? वाचा चाणक्य निती

SCROLL FOR NEXT