बदलत्या जीवनशैलीमुळे आता ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुण महिलांमध्येही स्तनाचा कर्करोग वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. उशिरा होणारे विवाह, पहिल्या अपत्याच्या जन्मातील उशीर, शारीरिक हालचालींचा अभाव आणि प्रोसेस्ड फूडचे वाढते सेवन यामुळे महिलांच्या शरीरातील संप्रेरकांचे संतुलन बिघडत आहे. तज्ज्ञांच्या मते, कम वयात हा आजार अधिक आक्रमक स्वरूप धारण करत असून, यामागील खरी कारणे आणि त्याची लक्षणे वेळीच ओळखणे अत्यंत आवश्यक आहे.
याशिवाय अनुवांशिक कारणेही याला कारणीभूत ठरत आहेत. कमी वयातील महिलांमध्ये हा आजार अधिक आक्रमक स्वरूपात समोर येत असल्याने वेळेत लक्षणे ओळखणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
या आजाराची सुरुवात नेहमीच वेदनेने होत नसल्यामुळे अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, स्तनात किंवा काखेत गाठ येणे, त्वचेचा रंग बदलणे, त्वचा संतऱ्याच्या सालीसारखी खडबडीत होणे किंवा निप्पलच्या आकारात बदल होऊन असामान्य स्त्राव होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे असू शकतात. अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास ती सामान्य न मानता तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.
या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक महिलेने दरमहा स्वतःच्या स्तनांची तपासणी करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे पौष्टिक आहार घेणे, वजन नियंत्रणात ठेवणे आणि मद्यपान किंवा धूम्रपान टाळणे अत्यंत फायदेशीर ठरते. ज्यांच्या कुटुंबात आधी कोणाला तरी कॅन्सर आहे, त्यांनी वेळेवर स्क्रीनिंग आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या करून घेतल्यास या धोक्यापासून बचाव करता येऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.