Importance Of Women Equality Day : स्त्रिया मानवजातीचा आधार आहेत. स्त्री ही आयुष्य पुढे सरकवते. स्त्री केवळ मुलाला जन्म देत नाही तर त्याचे पालनपोषणही करते. मुलाला चांगले संस्कार त्याच्या आईकडूनच मिळतात. न जाणो स्त्री किती नात्यांमध्ये रंग भरते. कधी ती आई बनून ममता लुटते, कधी पत्नी, मुलगी, बहीण बनून नातेसंबंध जपते, पण ही महिलाही आपल्या हक्कासाठी अनेकदा लढत असते.
भारतासह अजून अनेक देश आहेत जिथे अजूनही महिलांना समानतेसाठी संघर्ष करावा लागतो. घर असो किंवा ऑफिस, स्त्रीला नेहमीच पुरुषांकडून कमी लेखले जाते. एकदा स्त्रीच्या हातात काही जबाबदारी दिली की ती पुरुषांपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडू शकते.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रिया (Women) सर्वकाही सुंदर बनवतात. महिला आजपासून नाही तर वर्षानुवर्षे त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत. म्हणूनच महिला समानता दिन दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.
इतिहास
अमेरिकेत 1853 पासून महिलांच्या हक्कांसाठी लढा सुरू झाला. येथे महिलांनी लग्नानंतर संपत्तीवर हक्क मागायला सुरुवात केली. त्यावेळी अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांमध्ये महिलांना फारच कमी अधिकार दिले जात होते. पुरुष महिलांना गुलाम मानत असत.
यानंतर 1890 मध्ये अमेरिकेत नॅशनल (National) अमेरिकन वुमन सफ्रेज असोसिएशनची स्थापना झाली. या वेळेपर्यंत अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. या संस्थेच्या लोकांनी महिलांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत बोलले. 1920 साली अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
यानंतर 1971 मध्ये अमेरिकन संसदेने दरवर्षी 26 ऑगस्ट हा महिला समानता दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात अमेरिकेत झाली. यानंतर जगभरात महिला समानता दिन साजरा केला जात आहे.
या दिवशी विशेष म्हणजे
या दिवशी अमेरिकेसह जगभरात महिलांच्या हक्कांची (Rights) चर्चा होते. ठिकठिकाणी परिषदा, परिसंवाद आयोजित केले जातात. महिलांच्या हक्कांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी महिला संघटना मोहिमा चालवतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.