Almond Oil For Hair Saam Tv
लाईफस्टाईल

Almond Oil For Hair : केसांची वाढ खुंटलीये? घनदाट केसांसाठी बदामाच्या तेलाचा असा करा वापर, महिनाभरात फरक दिसेल

Hair Falls Problem : जीवनशैलीनुसार खाण्यापिण्याच्या सवयी आणि प्रदूषणामुळे केसांची नीट काळजी घेता येत नाही. त्यामुळे केसांची वाढ खुंटण्याची समस्या अधिक प्रमाणात होताना दिसून येत आहे.

कोमल दामुद्रे

Winter Hair Care Tips:

केसांच्या वाढीसाठी केसांना तेल लावणे तितकेच महत्त्वाचे आहे. बदलेली जीवनशैलीनुसार खाण्यापिण्याच्या सवयी आणि प्रदूषणामुळे केसांची नीट काळजी घेता येत नाही. त्यामुळे केसांची वाढ खुंटण्याची समस्या अधिक प्रमाणात होताना दिसून येत आहे.

केस पांढरे दिसणे, केसांची वाढ खुंटणे, केसगळती आणि अशा अनेक केसांच्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. रासायनिक उत्पादनांचा वापर केल्यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे तुम्हाला घनदाट केसांसाठी बदामाचे तेल लावायला हवे. याचा वापर कसा करायचा जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अँटिऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड्सने परिपूर्ण असलेले बदामाचे तेल आपल्या शरीराला आतून आणि बाहेरुन मजबूत करण्यास मदत करतात. याचे तेल (Oil) केसांसाठी फायदेशीर ठरते. तेलाचा वापर कसा करायचा पाहूया

झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे आपले अकाली पिकू लागतात. त्यामुळे केसात (Hair) कोंडा होणे किंवा केसगळतीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी बदामाचे तेल केसांना पोषण प्रदान करते. त्यामुळे याचा वापर करताना केस लांब, जाड आणि मजबूत होतात.

केसांना कसे मिळेल पोषण

1. बदामाचे तेल कोरफड जेल

रात्री झोपण्यापूर्वी अर्धा कप कोरफड जेलमध्ये एक चतुर्थांश कप बदाम तेल मिसळून केसांच्या टाळूला लावा. संपूर्ण डोक्याला मसाज करा. सकाळी कोमट पाण्याने (Water) केस धुवा. यामुळे केसगळती थांबण्यास मदत होते.

2. बदामाचे तेल आणि लिंबाचा रस

बदामाच्या तेलात दोन चमचे लिंबाचा रस मिसळून टाळूवर लावा. १० ते १५ मिनिटे चांगला मसाज करा. सकाळी शाम्पूने केस धुवा. यामुळे केसांना पोषण मिळेल.

3. बदामाच्या तेलाने मालिश करा

१० ते १५ मिनिटे कोमट बदामाच्या तेलाने केसांना पूर्णपणे मसाज करा. बदामाच्या तेलाने केसांना मालिश केल्यास टाळूला पोषण मिळते. रक्ताभिसरणही सुधारते. त्यामुळे केसांची चांगली वाढ होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT