Winter Diet: ओमिक्रॉन आणि सर्दीपासून दूर राहायचं? आहारात करा 'या' आरोग्यदायी गोष्टींचा समावेश
Winter Diet: ओमिक्रॉन आणि सर्दीपासून दूर राहायचं? आहारात करा 'या' आरोग्यदायी गोष्टींचा समावेश saam Tv
लाईफस्टाईल

Winter Diet: ओमिक्रॉन आणि सर्दीपासून दूर राहायचं? आहारात करा 'या' आरोग्यदायी गोष्टींचा समावेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

थंडीच्या ऋतूत आहारात मसालेदार पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे आरोग्याची अनेक प्रकारची हानी होत असते. या ऋतूत तुम्हाला फिट ठेवायचे असेल तर जास्त कॅलरीयुक्त पदार्थांपासून दूर राहा. तळलेले, गरम आणि मसालेदार पदार्थ वजन वाढवण्यासोबत आजार वाढवतात.

हिवाळ्यातील आहार : हिवाळ्यात गरमागरम आणि चविष्ट पदार्थ खाणे सर्वांनाच आवडते. या हंगामात तेल आणि तूप असलेल्या खाद्यपदार्थांचे प्रमाण वाढते. या गोष्टी तुमच्या शरीराला उष्णता देत आहेत असे जरी तुम्हाला वाटत असेल, परंतु या गोष्टींमध्ये भरपूर कॅलरीज असतात, ज्यामुळे शरीरामध्ये नुकसान होऊ शकते. या ऋतूत आरोग्य तज्ज्ञ जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्यास का नकार देतात ते जाणून घेऊया.

हिवाळ्यात काय खावे- हिवाळ्याच्या मोसमात अशा गोष्टी खाव्यात की ज्यांनी आपले मन आणि पोट दोन्ही भरून राहतील आणि ज्यात कॅलरीजही कमी असतात. पोषणतज्ञांच्या मते, यावेळी तुम्ही तुमच्या आहारात सूपचे प्रमाण वाढवावे. पोट भरण्यासोबतच ते पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात आणि शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात.

उच्च-कॅलरी खाद्यपदार्थांच्या ऐवजी उत्तम पदार्थांची निवड- या हंगामात संपूर्ण धान्य आणि ओट्स आणि नाचणी यांसारख्या फायबरयुक्त पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले असते. या पदार्थांमुळे जास्त काळ पोट भरलेले असते, यामुळे तळलेले आणि जंक फूड खाण्यापासून हे पदार्थ आपल्याला लांब ठेवतात. याशिवाय बीटरूट, आर्बी आणि रताळे देखील साखरेची कमतरता भरून काढतात. काही चटपटीत खावेसे वाटत असेल तर भजीऐवजी वाफेचा ढोकळा खाऊ शकता. किंवा आरोग्यदायी पदार्थात चटणी किंवा चाट मसाला घालूनही त्याचा आस्वाद घेऊ शकता. उकडलेल्या काळ्या हरभऱ्याच्या चाटमध्येही जास्त प्रथिने असतात आणि चरबी कमी असते. मसाला किंवा भेळ कॉर्न हेल्दी हिवाळ्यातील स्नॅक्समध्येही येतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heatwave Care: उष्माघाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी 'अशी' काळजी घ्या

Today's Marathi News Live : नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू; धमकीच्या मेलने खळबळ

Viral Video: मस्ती केली, चांगलीच जिरली! भररस्त्यात तरुण खुर्ची टाकून बसला; पुढं जे घडलं ते... धक्कादायक VIDEO

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात डायलिसिस सुविधा मिळणार मोफत, साई भक्ताकडून 24 लाखाच्या मशीनची देणगी

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

SCROLL FOR NEXT