Health Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Health Benefits : हाडांचे आरोग्य आणि पचन संस्थेसाठी बहुगुणी आहे तीळ-गूळ, इतर फायदेही वाचा

Winter Care Tips : हिवाळा सुरु झाला की, आपल्याला अधिक उबदार पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. बदलणाऱ्या वातावरणाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. हाडे दुखणे, स्नायू दुखी आणि पचन संस्थेसाठी तीळ-गूळ खाल्ले जाते.

कोमल दामुद्रे

Health Benefits Of Eating Jaggery And Sesame Seeds In Winters :

हिवाळा सुरु झाला की, आपल्याला अधिक उबदार पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. बदलणाऱ्या वातावरणाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. हाडे दुखणे, स्नायू दुखी आणि पचन संस्थेसाठी तीळ-गूळ खाल्ले जाते.

तीळ आणि गुळाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी याचा आहारात समावेश केला जातो. ज्यांना थंडीचा अतिप्रमाणात त्रास होतो. त्यांनी नियमितपणे तीळ आणि गूळाचे सेवन करायला हवे. जाणून घेऊया याचे इतर अनेक फायदे

1. एनर्जी बूस्ट

गूळामध्ये कर्बोदके अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढवण्यास मदत होते. तीळ हे प्रथिने समृद्ध असतात. ज्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. हिवाळ्यात याचे सेवन केल्याने शरीराला उष्णता मिळेल.

2. आरोग्यासाठी फायदेशीर

तीळ (Sesame) आणि गूळाचे सेवन दातांच्या बळकटीसाठी फायदेशीर (Benefits) आहे. याशिवाय केसांची वाढ चांगल्या प्रमाणात होते. मूत्राशयाचा त्रास असणाऱ्यांनी तीळ, दूध आणि गूळ मिसळून प्यायल्याने हा आजार कमी होतो.

3. पोषक तत्वांनी समृद्ध

तीळ हे कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त यासह आवश्यक पोषक तत्वांचा चांगला स्त्रोत आहे. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

4. पचनक्रिया सुधारते

गूळ (Jaggery) हा त्याच्या पाचक गुणधर्मासाठी ओळखला जातो. हे पाचनतंत्र राखण्यास मदत होते. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी फायदेशीर ठरु शकते. तीळामध्ये देखील अधिक फायबर असते.

5. अँटिऑक्सिडंट गुणधर्म

तिळाच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. तसेच त्यात सेसमिन आणि सेसॅमॉलही आहेत ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. गुळात अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे त्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

6. रक्तातील साखरेची पातळी

गुळात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे साखरेची पातळी हळूहळू वाढते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी गूळ फायदेशीर आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT