WINTER CLOTHING CARE TIPS saam tv
लाईफस्टाईल

Winter Wardrobe : हिवाळ्याचे कपडे बाहेर काढण्यापूर्वी करा ही ५ कामे, स्वच्छता ते साठवणुकीपर्यंत या टिप्स उपयुक्त ठरतील

ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या गुलाबी थंडीत आपण हिवाळ्याचे कपडे बाहेर काढतो. हे कपडे दीर्घकाळ स्वच्छ आणि टिकवून ठेवण्यासाठी या सोप्या टिप्स नक्की वाचा

Saam TV News

आता गुलाबी थंडीची चाहूल लागली असून, सकाळी आणि संध्याकाळी गारवा जाणवू लागला आहे. कपाटात वर्षभर बंद असलेले स्वेटर, जॅकेट आणि लोकरीचे कपडे बाहेर काढण्याची वेळ आली आहे. पण महिनान् महिने पेटीत पडून राहिल्यामुळे या कपड्यांना कुबट वास येऊ लागतो, आणि कधीकधी त्यावर दमटपणाचा परिणामही झालेला दिसतो. लोकरीचे कपडे थेट अंगावर घालण्याऐवजी काही सोप्या आणि प्रभावी गोष्टींची काळजी घेतल्यास ते दीर्घकाळ स्वच्छ, सुरक्षित आणि छान सुवासिक राहतील.

कपड्यांना उन्हात वाळवा

हिवाळ्याचे कपडे दीर्घकाळ कपाटात किंवा पेटीत बंदिस्त असतात. जरी तुम्ही ते धुऊन ठेवले तरी, त्यात हलका कुबट वास येऊ शकतो. अशा वेळी ते पुन्हा घालण्यापूर्वी उन्हात वाळवणे गरजेचे आहे. म्हणून, हिवाळ्याचे कपडे बाहेर काढल्यानंतर त्यांना सर्वात आधी 3-4 तास चांगल्या उन्हात वाळवून घ्या. यामुळे कपड्यांमधील ओलावा आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. याशिवाय घरातील सर्व गाद्या आणि गोधड्यांनाही चांगले ऊन दाखवा, जेणेकरून त्यातील दुर्गंधी आणि ओलावा नाहीसा होईल.

कपडे वेगवेगळे करा

हिवाळ्याच्या दिवसांत उन्हाळ्याचे कपडे बाजूला केले जातात आणि सर्व गरम कपडे कपाटात जागा घेतात. तथापि, कपाटात घड्या करून ठेवण्यापूर्वी काही गोष्टी नक्की तपासा. कपडे वापरण्यापूर्वी त्यावर डाग, बुरशी, कीटकांचे निशाण किंवा खराब इलास्टिक व्यवस्थित तपासा. जर कपड्यांवर असे काही असेल तर ते वेगळे ठेवा. ते पुन्हा नीट धुऊन वाळवा आणि मग कपाटात ठेवा.

कपडे धुऊन वाळवा

हिवाळ्याच्या कपड्यांवरील डाग किंवा दुर्गंधी जात नसेल, तर ते धुऊन व्यवस्थित वाळवून घ्या. लोकरीचे कपडे वापरण्यापूर्वी सौम्य डिटर्जंट आणि थंड पाण्यात चांगल्या प्रकारे धुवा. त्यानंतर ते उन्हात व्यवस्थित वाळवा. यामुळे दुर्गंधी कमी होण्यास आणि कपडे स्वच्छ ठेवण्यास मदत होते.

कपाट स्वच्छ करा

लोकरीचे कपडे इतर कपड्यांपासून वेगळे ठेवा. ते ठेवण्यासाठी सर्वप्रथम कपाटाचा तो भाग रिकामी करा, जिथे तुम्हाला ते ठेवायचे आहेत. आता कपड्यांच्या मदतीने कपाटातील धूळ चांगली साफ करा आणि कपाट कोरडे होऊ द्या. हवे असल्यास तुम्ही कपाटात कडुनिंबाची पाने किंवा कापूर ठेवू शकता. यामुळे कपड्यांना कीटक लागत नाहीत.

कपडे योग्य पद्धतीने ठेवा

लोकरीचे कपडे धुऊन आणि वाळवून घेतल्यानंतर कपाटात व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकता. यासाठी जड स्वेटर हँगर करण्याऐवजी घड्या करून ठेवा. हे कपडे स्वच्छ, कोरड्या कव्हरमध्ये ठेवता येतील. तसेच वेगवेगळे कपडे वेगवेगळ्या विभागात ठेवा, जेणेकरून तुम्हाला कपडे शोधणे सोपे जाईल.

कडक उन्हापासून बचाव

लोकरीचे कपडे वाळवताना कधीही थेट कडक उन्हात टाकू नका. यामुळे त्यांचा रंग उडू शकतो आणि कापड कडक होऊ शकते. त्याऐवजी सावलीत किंवा हलक्या उन्हात पसरवून वाळवावेत.

प्लास्टिकच्या पिशव्या टाळा

उलनचे कपडे कधीही हवाबंद प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवू नका. दमटपणा वाढून कपडे खराब होण्याची शक्यता असते, त्याऐवजी सुती कापडाच्या पिशव्या किंवा कव्हर वापरा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer News : सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी ४ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra News Live Update: मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

DA Hike Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! DA वाढीची घोषणा कधी होणार? पुढच्या आठवड्यात काय घडणार?

Epilepsy : फिट आल्यावर लगेच करा 'हे' काम, वाचू शकतो रुग्णाचा जीव

Loose Motion: जुलाब झाल्यानंतर कोणते पदार्थ खावे आणि कोणते टाळावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT