Gas and Gas Pain saam tv
लाईफस्टाईल

Gas Pain : नसांमध्ये का तयार होतो गॅस? शरीरातील विविध भागात होऊ लागतात तीव्र वेदना

Can Gas Cause Pain in Veins: अनेक व्यक्तींना गॅसेसचा त्रास होतो. यामुळे शरीरात अनेक ठिकाणी वेदना होतात. यामुळे व्यक्तींना दैंनदिन कामामध्ये व्यत्यय येऊ शकतो. याची कारणं काय आहे ती पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

गॅसचा त्रास अनेकांना असह्य होतो. गॅसमुळे व्यक्तीला शरीरात विविध ठिकाणी वेदना होतात. परंतु गॅस नेमका कोणत्या कारणामुळे होतोय हे आपल्याला समजू शकत नाही. अनेकांना नसांमधील गॅसमुळे होणाऱ्या वेदनांचं कारण समजत नाही. वायूमुळे होणाऱ्या मज्जातंतूंच्या वेदनांची कारणं जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. नसांमध्ये गॅस तयार होण्याच्या कारणांबद्दल या आर्टिकलमधून जाणून घेऊया.

पचनतंत्रामध्ये बिघाड होणं

नसांमध्ये गॅस तयार होण्यामागे पचनसंस्थेतील समस्या असू शकतात. पचनक्रियेत अडथळा आल्यामुळे अन्न योग्य पद्धतीने पचत नाही. ज्यामुळे आतड्यांमध्ये गॅस तयार होऊ लागतो. या वायूमुळे नसाजवळ दाब निर्माण होतो ज्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना होऊ शकतात.

चुकीचा आहार

तळलेलं अन्न, फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स खाणं किंवा उशिरा जेवणं हे पोटात गॅस तयार होण्याचं एक प्रमुख कारण आहे . यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. अशावेळी वायू नसांमध्ये अडकू शकतो.

शारीरिक एक्टिव्हीटी कमी होणं

शरीराची हालचाल कमी झाल्यामुळेही नसांमध्ये गॅस निर्माण होऊ शकतो. कमी प्रमाणातील एक्टिव्हीटीमुळे पचन मंदावते ज्यामुळे वायू तयार होतो आणि नसांमध्ये दाब येतो. यामुळे गॅसचा त्रास होऊ शकतो.

ताणतणाव

मानसिक ताणाचा थेट परिणाम तुमच्या पोटावर आणि पचनसंस्थेवर होत असतो. यामुळे जास्त गॅस तयार होण्याची भीती असते. अशावेळी तुम्हाला नसांमध्ये जडपणा आणि वेदना जाणवू शकतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविकेचं आंदोलन

Eyebrow Hair Loss: भुवयांचे केस विरळ होतायत? शरीर देत असलेल्या गंभीर आजारांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका

Panvel : पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, कस्टमर म्हणून गेले अन्...

Plane Crash : भीषण अपघात! उड्डाणानंतर क्षणात कोसळले विमान; १० जणांचा जागीच मृत्यू

Famous Actress : बिग बॉस फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; बॉयफ्रेंडसोबत घेतले सात फेरे, सुंदर PHOTOS आले समोर

SCROLL FOR NEXT