Symptom of Tinnitus Google
लाईफस्टाईल

Symptom of Tinnitus: कोणत्या भयानक आजारामुळे कानात शिट्टीचा आवाज येतो? लगेचच जाणून घ्या

Hearing Loss : कानात शिट्टीचा किंवा भिनभिनणारा आवाज ऐकू येतोय? ही टिनिटसची लक्षणं असू शकतात. वेळेत उपचार न केल्यास बहिरेपणापर्यंत धोका वाढतो. कारणे, उपचार आणि उपाय जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

  • कानात शिट्टी, भिनभिनणारा आवाज आला तर हा टिनिटस आजार असू शकतो.

  • वेळेत उपचार न केल्यास बहिरेपणाचा धोका वाढतो.

  • हृदयरोग, थायरॉईड, सायनस यांसारखी कारणे कारणीभूत ठरू शकतात.

  • थेरपी, औषधे आणि योग-ध्यानाने लक्षणे कमी करता येतात.

काहींच्या कानात अचानक शिट्टीचा आवाज येत असतो. तुम्हाला ही समस्या सामान्य कारणामुळे झाल्यासारखी वाटत असले. पण तुमचे हे मत चुकीचे आहे. कानात अचानक वाजणारा, शिट्टीसारखा किंवा भिनभिनणारा आवाज ऐकू आला तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

या समस्येला वैद्यकीय भाषेत 'टिनिटस' असे म्हटले जाते. या आजारात असा आवाज ऐकू येतो जो दुसऱ्या कोणालाही ऐकू येत नाही. अनेकजण या समस्येला हलक्यात घेतात, मात्र हाच निष्काळजीपणा गंभीर आजारांना आमंत्रण देतो. यावर वेळेत उपचार न केल्यास रुग्ण चक्क बहिरा होऊ शकतो. तसेच मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो.

डॉक्टरांच्या मते, कानाच्या नसांमध्ये समस्या निर्माण झाल्यास टिनिटस होऊ शकतो. तसेच कानात अडथळा येणे, श्रवणशक्ती अचानक कमी होणे, संसर्ग, सायनस, हार्मोनल बदल, थायरॉईड आणि मेंदूतील ट्यूमर या कारणांमुळेही ही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. काही प्रकरणांमध्ये हृदयरोग आणि रक्ताभिसरणातील अडचणीसुद्धा टिनिटससाठी कारणीभूत ठरु शकतात.

या आजाराकडे दुर्लक्ष केल्याने भविष्यात आणखी संकटांना सामोरे जावे लागू शकते. टिनिटस सारखा वाढत राहिला तर तुमची ऐकण्याची शक्ती संपू शकते. काही प्रकरणांमध्ये चेहऱ्याच्या पक्षाघाताला सामोरे जावे लागू शकते. ही समस्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे एखादा व्यक्ती नैराश्येच्या जाळ्यात अडकत जातो. त्यातून बाहेर निघणे हे अत्यंत कठीण होऊन बसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ड्रोन लाईट शोद्वारे पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छांनी उजळणार पुण्याचे आकाश

Supreme court : सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका; राजकीय पक्षांच्या नोंदणीवरून घेतला महत्वाचा निर्णय

Nepal Protest: नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसवर आंदोलकांचा हल्ला; अनेकजण जखमी

Shocking: घराजवळच्या तलावात आढळला काँग्रेस नेत्याचा मृतदेह, राजकीय वर्तुळात खळबळ

Hingoli Rain: हिंगोलीत मुसळधार पावसामुळे हळद पिक पाण्याखाली; बळीराजा संकटात|VIDEO

SCROLL FOR NEXT