Sakshi Sunil Jadhav
खरा मित्र संकटाच्या काळात उभा राहतो. जो फक्त आनंदात असतो आणि अडचणीतून पळतो, तो विश्वासघात करणारा असतो.
तुम्ही सांगितलेली वैयक्तिक माहिती इतरांना सांगणारा मित्र धोकादायक असतो.
तुमच्या यशाने आनंदी न होता चिडणारा, चांगल्या कामांवर टोमणे मारणारा मित्र खरा साथीदार नसतो.
समोर गोड बोलणारा आणि मागे वाईट बोलणारा हा दगाबाज मित्राचा सर्वात मोठा संकेत असतो हे आपण वेळीच ओळखले पाहिजे.
जेव्हा काम असतं तेव्हा भेटणारा, नाहीतर इतरवेळी दूर राहणारा मित्र म्हणजे फसवणूक करणारा मित्र असतो.
संकट किंवा तुम्ही हरला असाल वाईट काळात असताना आनंद मानणारा मित्र नसून शत्रू असतो हे नेहमी लक्षात ठेवा.
वचन दिलं आणि मोडलं, आधार देण्याचं सांगून टाळलं अशा कृतींनी त्याचा स्वभाव स्पष्ट होतो.
तुमच्या विरोधकांसोबत मैत्री करणारा माणूस विश्वासघात करणाराच असतो.