Sakshi Sunil Jadhav
दीपिका पदुकोणने मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
दीपिका पदुकोणने तिच्या लेकीसाठी खास बर्थडेचा केक बनवला आहे. तिच्या लेकीचे नाव हे 'दुआ' आहे.
बॉलीवूडमधील दीपिका-रणवीरने त्यांच्या लेकीचा पहिला वाढदिवस एका खास शैलीत साजरा केला. दुआचा वाढदिवस हा ८ सप्टेंबर रोजी होता.
वाढदिवसानिमित्त दिपिकाने खास स्पेशल होममेड चॉकलेटचा केक बनवला होता. त्याच फोटोचा केक तिने सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यावर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दीपिकाच्या मुलीचा जन्म ८ सप्टेंबर २०२४ रोजी झाला. काही दिवसांनंतर दीपिकाने लेकीचे नाव देखील जाहीर केले होते.
चाहते सध्या मुलीची झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. पण सोशल मीडियावरील माध्यमांनी दुआचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यामुळे हे जोडपे प्रेक्षकांवर नाराज होते.
दुआचा जन्म झाल्यापासून दीपिका संपूर्ण वेळ तिच्यासोबत घालवणं पसंत करते. यासाठी दीपिकाने आगामी चित्रपटांचे शुटिंगही सुरु केलेले नाही.