Vinod Kambli health update saam tv
लाईफस्टाईल

Vinod Kambli: मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या का होतात? विनोद कांबळीला नेमका कोणता आजार आहे?

Vinod Kambli health update: विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड देतोय. त्याची मुख्य समस्या रक्ताभिसरण आणि रक्ताच्या गुठळ्या यांच्याशी संबंधित आहे.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाचा माजी खेळाडू विनोद कांबळीला सध्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. कांबळीला ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं.

रिपोर्ट्सनुसार, विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड देतोय. त्याची मुख्य समस्या रक्ताभिसरण आणि रक्ताच्या गुठळ्या यांच्याशी संबंधित आहे. नुकतेच एका मुलाखतीत कांबळीने त्याच्या तब्येतीबद्दल माहिती दिली होती. विनोद कांबळीच्या सांगण्यानुसार, त्याला युरिन इन्फेक्शनचा त्रास झाला होता. या समस्येमुळे त्याला तीनदा रुग्णालयात दाखल करावं लागलं.

नेमकी काय आहे रक्ताच्या गुठळ्या बनण्याची समस्या?

मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणं ही कांबळीच्या आरोग्याची सर्वात प्रमुख समस्या आहे. वैद्यकीय भाषेत याला 'ब्लड क्लॉटिंग' असं म्हणतात. जेव्हा मेंदूतील रक्तप्रवाहात अडथळा येतो तेव्हा गुठळ्या तयार होतात. मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्या की त्यामुळे स्ट्रोक, चक्कर येणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. यामागे इतर अनेक कारणं आहेत ती खालीलप्रमाणे-

हार्ट सर्जरी: विनोद कांबळीवर 2013 मध्ये दोन हृदय शस्त्रक्रिया झाल्या होत्या. ज्यामुळे त्याच्या रक्ताभिसरण प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

हाय ब्लड प्रेशर: उच्च रक्तदाबामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता वाढते.

लाइफस्टाईलची निगडीत गोष्टी: खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढत्या वयामुळे या समस्येचा धोका वाढतो.

डॉक्टरांनी काय दिलाय सल्ला?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार आणि औषधांचं सेवन अत्यंत आवश्यक आहे. ज्या लोकांनी आधीच हृदय शस्त्रक्रिया केली आहे त्यांनी विशेषतः त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT