Hair Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care Tips : पांढरे केस होतील काळे! डाएटमध्ये आजच या पदार्थांचा समावेश करा, केसगळतीही थांबेल

White Hair Superfood : केसगळती आणि पांढरे केस होण्याचे एकमेव कारण म्हणजे पोषणाचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, मानसिक ताण आणि केसांची काळजी न घेणे. जर तुमचे केस देखील कमी वयात पांढरे होतायत तर आहारात या पदार्थांचा समावेश करा.

कोमल दामुद्रे

White Hair Problem :

वय वाढू लागले की, शरीरात अनेक बदल होतात. वजन वाढणे, गुडघेदुखी, कंबरदुखी, मधुमेहसारख्या इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु, लहान मुलांपासून मोठ्या वयोगटातील प्रत्येक व्यक्ती केसगळती आणि पांढऱ्या केसांच्या समस्येमुळे त्रस्त आहे.

अगदी कमी वयात पांढरे केस (Hair) झाल्यामुळे अनेक जण डाय करतात तर काहीजण केमिकल उत्पादनांचा वापर करतात. परंतु, केसगळती आणि पांढरे केस होण्याचे एकमेव कारण म्हणजे पोषणाचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, मानसिक ताण आणि केसांची काळजी न घेणे. जर तुमचे केस देखील कमी वयात पांढरे होतायत तर आहारात (Food) या पदार्थांचा समावेश करा.

1. पालेभाज्या

कॅल्शियम, जीवनसत्त्वे (Vitamins), फोलेट आणि फॉस्फरस यांसारख्या अनेक खनिज पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेल्या हिरव्या भाज्या आपल्या केसांना पोषण देतात. ज्यामुळे केस काळे, जाड आणि लांब होण्यास मदत होते.

2. दुग्धजन्य उत्पादने

दुग्धजन्य पदार्थांमधून व्हिटॅमीन बी १२ आणि कॅल्शियम पुरेशा प्रमाणात मिळते. ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे, लांब होण्यास मदत होईल. तसेच शरीराला मुबलक प्रमाणात प्रथिने मिळतील.

3. डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध आहे. यामध्ये भरपूर पोषकतत्व असतात. जे केस काळे आणि लांब करण्यास मदत करतील.

4. आवळा

आयुर्वेदात आवळ्यासाठी अधिक महत्त्व दिले आहे. अनेक रोगांवर आवळा बहुगुणी ठरतो. आवळ्यात अँटी-एजिंग, अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक आहेत. आवळ्याच्या रसाचे नियमितपणे सेवन केल्यास केसांसाठी फायदा होतो.

5. अंडी

अंड्यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी १२, ए, ई, बायोटिन आणि फोलेट केसांना पुरेसे पोषण देते. तसेच नैसर्गिकरित्या केस काळे, लांब आणि जाड करण्यास मदत करते.

6. सोयाबीन

अँटी ऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले सोयाबीन केसांसाठी अधिक पोषक तत्वांचा खजिना आहे. हे केसांचे संरक्षण करते तसेच केस काळे करण्यास त्याची वाढ होण्यास देखील मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT